क्षय झालेल्या रुग्णांची काळजी तुम्ही कशी घ्याल?, आजाराविषयी समाजात गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 11:36 AM2023-03-20T11:36:24+5:302023-03-20T12:05:36+5:30

उच्च प्रथिनयुक्त आहारामुळे उपचारादरम्यान होणारे प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होते आणि सरकार रुग्णांची काळजी घेण्यासाठी हे पाठबळ प्रदान करते.

How do you take care of patients with caries?, Misconceptions in society about the disease | क्षय झालेल्या रुग्णांची काळजी तुम्ही कशी घ्याल?, आजाराविषयी समाजात गैरसमज

क्षय झालेल्या रुग्णांची काळजी तुम्ही कशी घ्याल?, आजाराविषयी समाजात गैरसमज

googlenewsNext

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने २०३० तर भारताने २०२५ पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटनाचा निर्धार केला आहे. परिणामी, अजूनही समाजात या आजाराविषयी गैरसमज आहेत. हे दूर सारुन खऱ्या अर्थाने क्षय रुग्णांची काळजी घेण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रुग्णांना तीन हजार रुपये
केंद्र सरकार थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सर्व नोंदणीकृत आणि अधिसूचित क्षय रुग्णांना दरमहा ५०० रुपये देते. हे पाठबळ उपचार कालावधीपर्यंत प्रदान केले जाते. जरी उपचार दोन वर्षांपर्यंत वाढले तरीही दिले जातात.  मुळात रुग्णांना पोषक आहार मिळावा यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. 

उच्च प्रथिनयुक्त आहारामुळे उपचारादरम्यान होणारे प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होते आणि सरकार रुग्णांची काळजी घेण्यासाठी हे पाठबळ प्रदान करते.

आहाराचे किट ही दिले जाते
निक्षय मित्रांनी क्षय रुग्णांना मोठ्या व्यक्तीकरिता- नाचणी, बाजरी, ज्वारी, गहू, तीन किलो, डाळ दीड किलो, तेल २५० ग्रॅम, शेंगदाणा, दूध, पावडर एक किलो तर लहान बालकांना नाचणी, बाजरी, ज्वारी, गहू दोन किलो, डाळ एक किलो, तेल १५० ग्रॅम, शेंगदाणा, दूध पावडर ७५० ग्रॅम याप्रमाणे पोषण आहार किट दरमहा द्यावयाचे आहे. या पोषण आहाराचे उद्दिष्ट रुग्णाचे पोषण योग्य पद्धतीने होऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा होय. अशाप्रकारे रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले. 

प्रत्येक रुग्ण दत्तक 
प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियानांतर्गत निक्षय मित्र ही योजना देशभरात कार्यान्वित करण्यात आली आहे. 
क्षयरोग बाधितांचा पोषक आहार, तपासण्यांचा खर्च, उपचाराकरिता खर्च किंवा गंभीर आजारातून बरे होण्यासाठी पुनर्वसन करण्याकरिता निक्षय मित्र मदत करू शकतात.
 निक्षय मित्र एक किंवा अनेक क्षय बाधितांना मदत करतो. किमान सहा ते तीन वर्ष क्षय बाधितांना मदत करता येते.

क्षयरोगाचे प्रकार आणि लक्षणे
 ढोबळमानाने क्षयरोगाचे दोन प्रकार आहेत. फुफ्फुसांचा क्षयरोग (पल्मनरी ट्युबरक्युलोसीस) याचा परिणाम फुफ्फुसांवर होतो 
  एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसीस याचा परिणाम फुफ्फुसांसोबतच इतर अवयवांवर ही होतो.

कशी काळजी घ्यावी? 
क्षयरोगाचे उपचार दीर्घकालीन असतात. या कालावधीत अनेकदा रुग्ण व कुटुंबीय यांना सामाजिक,आर्थिक आणि मानसिक ताणातून जावे लागते. त्यामुळे क्षयरुग्णांचे उपचार पूर्ण करण्यावर अधिक भर देत, समाजातील गैरसमज दूर सारत या कुटुंबीयांचेही पाठबळ वाढविल्यास क्षय रोगावर नियंत्रण मिळविणे आणि प्रतिबंध करणे सोपे जाईल,असे मत श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अभिमन्यू देवस्थळी यांनी व्यक्त केले आहे.

  प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियान या योजनेंतर्गत समाजातील विविध घटक म्हणजेच दानशूर व्यक्ती, राजकीय व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सोसायट्या, औद्योगिक तसेच राजकीय संस्था या मदत करू शकतात. 
  अधिकाधिक क्षय रुग्णांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालिकेसह अन्य स्तरातून करण्यात येत आहे.

Web Title: How do you take care of patients with caries?, Misconceptions in society about the disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य