कोरोनाचा किडनीवर 'असा' होत आहे गंभीर परिणाम; डायलिसिस मशिनची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 01:34 PM2020-04-28T13:34:41+5:302020-04-28T13:46:16+5:30

सध्या व्हेंटिलेटरप्रमाणेच आता डायलिसिस मशीनची सुद्धा कमतरता भासत आहे.

How does corona virus affect kidney and challenges due to shortage of dialysis machines myb | कोरोनाचा किडनीवर 'असा' होत आहे गंभीर परिणाम; डायलिसिस मशिनची कमतरता

कोरोनाचा किडनीवर 'असा' होत आहे गंभीर परिणाम; डायलिसिस मशिनची कमतरता

Next

कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरासह भारतात वेगाने होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाशी निगडीत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहे. सुरुवातीला कोरोनाची लक्षणं सर्दी, ताप, खोकला अशी होती. पण आज जगभरातून ८० टक्के लोकांना कोरोनाची  लक्षण दिसत नसताना सुद्धा लागण झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाचं इन्फेक्शन झालेल्या रुग्णांच्या फुप्फुसांवर परिणाम होत आहे. तसंच हातांपायांवर सुज, जखमा येणं अशी लक्षण दिसत असताना किडनीवर सुद्धा कोरोना व्हायरसचा परिणाम होत आहे.

जगभरात कोरोना व्हायरसमुळे किडनीवर परिणाम झाल्याच्या अनेक घटना दिसून आल्या आहेत. यात किडनी फेल झाल्यामुळे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील ९ टक्के लोकांना एक्यूट किडनी इंज्यूरीचा सामना करावा लागला आहे. सध्या व्हेंटिलेटरप्रमाणेच आता डायलिसिस मशीनची सुद्धा कमतरता भासतेय.


कोरोना व्हायरसचा किडनीवर कसा परिणाम होतो.

साइंस जर्नलनुसार किडनी डॅमेजची समस्या सर्वाधिक कोरोना रुग्णांमध्ये दिसून आली आहे.  विशेषज्ञांच्यामते कोरोना व्हायरसचा थेट किडनीवर परिणाम होतो.  काही रुग्णांना मल्टिपल ऑर्गन फेल्योरची समस्या उद्भवते.  किडनीमध्ये मोठ्या प्रमाणावर Angiotensin-converting enzyme 2 (ACE2 ) रिसेप्टर असतात. त्यामुळे या सेल्समध्ये कोरोनाचा प्रवेश होतो.

किडनी शरीरातील रक्त फिल्टर करून त्यातील टॉक्सीन्स बाहेर फेकत असते. जर एखाद्या व्यक्तीला किडनीचं गंभीर संक्रमण झालं असेल तर किडनींच कार्य सुरळीत होत नाही. ब्लड प्यूरिफिकेशनचं काम आर्टीफिशिअल मशीन्सद्वारे केलं जातं. या मशीनला डायलिसिस म्हणतात. ही मशीन एकाप्रकारे किडनीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरते. पण जगभरातील अनेक देशांमध्ये डायलिसिस मशिन्सची कमतरता भासत आहे. ( हे पण वाचा-CoronaVirus : धोका वाढला! हॉटस्पॉटच्या हवेतही सापडले कोरोना विषाणूचे अंश)

भारतात दरवर्षी २ लाख लोकांना किडनीच्या आजारांचा सामना करावा लागतो. स्टेज 5 क्रॉनिक किडनी डिसॉर्डरच्या लोकांना डायलिसिसची आवश्यकता असते. त्यामुळे हेल्थ एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरस पसरल्यामुळे किडनीच्या रुग्णांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. सध्या भारतात सुद्धा कोरोनाच्या प्रसारामुळे मशिन्सची कमतरता भासत आहे. अशात मोठ्या संख्येने डायलिसिस मशिन उपलब्ध होणं कठिण होऊ शकतं. ( हे पण वाचा-तुम्ही इंजेक्शन देऊन पिकवलेलं कलिंगड खाताय का?; असा ओळखा फरक)

Web Title: How does corona virus affect kidney and challenges due to shortage of dialysis machines myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.