कसं येईल इन्फेक्शन तुमच्यापर्यंत?..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 06:02 PM2017-09-01T18:02:00+5:302017-09-01T18:05:03+5:30
पावसाळ्यात या ७ गोष्टी आवर्जुन करा आणि विसरून जा आजाराला..
- मयूर पठाडे
पावसाळा म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत साºयांनीच दवाखाने भरलेले असतात. याचं कारण इन्फेक्शन. याचकाळात जीवजंतूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आणि आपण आजारी पडतो, पण थोडीशी काळजी घेतली तरी पावसाळ्यातील संसर्ग आपण टाळू शकतो.
साधी आहाराची जरी काळजी घेतली तरी या संसर्गापासून आपली सुटका होऊ शकेल.
काय कराल?
१- बाहेरचं खाणं टाळा. त्यापेक्षा फळांवर, त्यातही चेरी, जांभूळ, लिची, केळी यासारख्या फळांकडे जास्त लक्ष द्या.
२- वेगवेगळ्या प्रकारचे गरमागरम सूप प्या. आजारांपासून ते तुम्हाला दूर तर ठेवतीलच, पण अनेक प्रकारची पौष्टिक मूल्यंही तुम्हाला त्यातून मिळतील.
३- हर्बल टी या काळात फारच उपयुक्त ठरू शकतो. त्यात आलं किंवा लिंबू पिळला तर हा चहा आणखीच उपयुक्त ठरू शकेल.
४- मध तर सर्वकाळ उपयुक्त असा घटक आहे. साखरेचा वापर कमी करून मधाचा वापर जर वाढवता आला तर तसं अवश्य करा. अॅँटीबॅक्टेरिया आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी मध फारच गुणकारी आहे.
५- आहारात लसणाचा वापर वाढवा. आहारातील लसणाच्या दोन पाकळ्याही तुमची पचनशक्ती वाढवेल आणि आजारांपासून तुम्हाला दूर राखेल. फ्लू पासून दूर राखण्यासाठी लसूण खूपच गुणकारी आहे.
६- हळदीचे गुण तर आपल्याला माहीतच आहेत. रोज रात्री झोपताना हळदीचं गरम दूध तुमच्यातील शक्ती वाढवील. थ्रोट इन्फेक्शनपासूनही त्यामुळे तुमची सुटका होईल.
७- याशिवाय जिरे आणि मेथ्या. याचाही आहारातला वापर आवर्जुन वाढवा.