कोलेस्ट्रॉलवर कीटो डाएट कशाप्रकारे प्रभाव करते? हार्ट अटॅकचा टळतो का धोका?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 10:18 AM2019-05-10T10:18:57+5:302019-05-10T10:27:15+5:30
शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण झालं की, आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही आपसूक डोकं वर काढतात.
शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण झालं की, आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही आपसूक डोकं वर काढतात. कोलेस्ट्रॉल नर्व्हस सिस्टीमचं नुकसान करण्यासोबतच लिव्हर डॅमेज करू शकतं. त्यासोबतच हृदयासाठी संबंधीत आजार आणि हार्ट स्ट्रोकचं कारणंही कोलेस्ट्रॉल ठरू शकतं. अशावेळी शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू नये किंवा ते नियंत्रणात रहावं यासाठी काळजी घेतली पाहिजे. अशात कीटो डाएट शरीराला फिट ठेवण्यास मदत करते, पण काय या डाएटमुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते? हे जाणून घेऊ.
वेगवेगळ्या रिसर्चनुसार, कीटो डाएट व्यक्तीच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासोबतच हृदयाचं आरोग्य आणि मेटाबॉलिक हेल्थवरही पॉझिटिव्ह प्रभाव करते.
कीटो डाएट बॅड कोलेस्ट्रॉल म्हटल्या जाणाऱ्या एलडीएलची साइज वाढवण्यास मदत करतं. याने या सेल्समध्ये असलेले फॅट नष्ट करण्यासाठी मदत करणाऱ्या पोषक तत्वांची संख्या वाढते. आणि ऑक्सिडेटिव स्ट्रेसचा धोकाही कमी होतो. ऑक्सिडेटिव स्ट्रेसमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो, अशात हृदय निरोगी राहण्यासाठी हे कमी करणं गरजेचं ठरतं.
(Image Credit : WebMD)
शरीरात एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि एचडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर योग्य असेल तर याने शरीराला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नुकसान करत नाही. कीटो डाएट यावर नियंत्रण मिळवू शकते. एचडीएल कोलेस्ट्रॉल कमी झालं तर कीटो डाएट त्याला वाढवण्यास मदत करते.
एचडीएल कोलेस्ट्रॉलला गुड कोलेस्ट्रॉलही म्हटलं जातं. कारण याने फॅट व कोलेस्ट्रॉलला लिव्हरपर्यंत पोहोचवत शरीरातून बाहेर काढण्यासही मदत मिळते. कोलेस्ट्रॉल कंट्रोल करत कीटो डाएट शरीरातील फॅटचं निर्मितीही कंट्रोल करते. ज्यामुळे शरीर फिट राहण्यास मदत मिळते.
काय आहे कीटो डाएट?
कीटो डाएट करुन शरीराला किटोसिस स्थितीमध्ये आणलं जातं. किटोसिस ही शरीराची एक मेटाबॉलिक स्थिती आहे. ज्यात शरीर फॅटचा वापर ऊर्जेच्या रुपात करतं. त्यामुळेच हा डाएट प्लॅन फॉलो शरीराची गरज, उंची आणि वजन यानुसार प्लॅन केला जातो. या स्थितीत शरीर ब्लड ग्लूकोजऐवजी फॅटचे तुकडे तोडून ऊर्जेच्या रुपात वापरतं. याने वजन वेगाने कमी होण्यास मदत मिळते.
(Image Credit : PhillyVoice)
कीटो डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचं दररोज २० ते ५० ग्रॅम सेवन करावं लागतं. म्हणजे या डाएटमध्ये कमी कार्बोहायड्रेट आणि जास्त हाय फॅट पदार्थांचं सेवन केलं जातं. मात्र जेव्ह आपण फार जास्त कोर्बोहायड्रेट असलेले पदार्थ खातो तेव्हा शरीरात ग्लूकोज तयार होतं. ग्लूकोजला शरीरा सहजपणे ऊर्जेत रुपांतरित करतं.
पण किटोजेनिक डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी केलं जातं. ज्यामुळे शरीरात किटोसिसची स्थिती निर्माण होते. किटोसिस एक अशी स्थिती आहे, ज्यात जेवण कमी केल्यानंतरही आपल्याला जिवंत ठेवण्यास मदत मिळते. ज्यात शरीर ग्लूकोजऐवजी फॅटचा ऊर्जेसाठी वापर करतं.
(टिप : वरील लेखात देण्यास आलेले सल्ले किंवा टिप्स ही केवळ माहिती म्हणूण वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याकडे प्रोफेशनल सल्ला म्हणूण बघता येणार नाही. डाएटमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा वरील टिप्स वापरण्यापूर्वी आधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की द्या.)