आयुष्य वाढवण्याचा एक सोपा उपाय, रोज न विसरता करा केवळ हे काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 10:16 AM2019-05-15T10:16:44+5:302019-05-15T10:20:36+5:30

एक्सरसाइज करणं फिटनेससाठी किती फायदेशीर असतं हे सर्वांनाच माहीत आहे. पण कामाचा वाढता ताण, प्रवासाचा वेळ आणि आळस यामुळे अनेकजण एक्सरसाइज करत नाहीत.

How exercise increases your life | आयुष्य वाढवण्याचा एक सोपा उपाय, रोज न विसरता करा केवळ हे काम!

आयुष्य वाढवण्याचा एक सोपा उपाय, रोज न विसरता करा केवळ हे काम!

(Image Credit : Student Voices)

एक्सरसाइज करणं फिटनेससाठी किती फायदेशीर असतं हे सर्वांनाच माहीत आहे. पण कामाचा वाढता ताण, प्रवासाचा वेळ आणि आळस यामुळे अनेकजण एक्सरसाइज करत नाहीत. त्यामुळे त्यांना माहीत असून सुद्धा ते एक्सरसाइजचे फायदे स्वत:ला करून घेऊ शकत नाहीत. एक्सरसाइजचे नेहमीच वेगवेगळे फायदे सांगितले जातात. रोज वॉक करण्याचा सल्ला दिला जातो. याचेही अनेक फायदे होतात हे वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे. एक्सरसाइजमुळे होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेगवेगळे आजार दूर राहतात आणि अर्थातच त्यामुळे आयुष्य वाढतं. 

वाढतं ७ वर्ष आयुष्य

वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, केवळ ३० मिनिटांच्या वॉकने आयुष्याचे ७ वर्ष वाढतात. जर हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुमचं आयुष्य कमी करताय. एक्सरसाइजबाबत शोधातून समोर आलं आहे की, आयुष्य वाढवण्याचा हा सर्वात चांगला पर्याय आहे. 

(Image Credit : Discover Magazine Blogs)

रोजच्या जीवनात जर तुम्ही एक्सरसाइज करू शकत नाही आहात, तर तुम्हाला वेगवेगळ्या शारीरिक आणि आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. असं नाहीये की, एक्सरसाइजने केवळ तुमचं आयुष्य वाढतं तर तुम्ही आयुष्यभर फिट रहाल आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील. 

एक्सरसाइजबाबत शोध काय सांगतात?

जर्मनीच्या सारलॅंड यूनिव्हर्सिटीमध्ये ३० ते ६० वयोगटातील ६९ अशा लोकांवर रिसर्च करण्यात आला, जे एक्सरसाइज करत नव्हते. अभ्यासकांनुसार, रोज केवळ ३० मिनिटे पायी चालण्याने तुमच्या आयुष्याचे ७ वर्ष वाढू शकतात.  

अभ्यासकांनुसार, रोज थोडावेळ एक्सरसाइज केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो. ते सांगतात की, परिश्रम करून किंवा एक्सरसाइज करून वृद्ध होणं कमी केलं जाऊ शकतं. रोज एक्सरसाइज केल्याने वय वाढण्याची प्रक्रिया कमी केली जाऊ शकते. याप्रकारे तुम्ही ७० वयातही तरूण दिसू शकता आणि तुम्ही चांगल्या फिटनेससह ९० ते ९५ वर्ष जगू शकता. 

खाण्याच्या सवयी आणि आहार

(Image Credit : National Post)

खाण्या-पिण्याचा आपल्या शरीरावर सर्वात जास्त प्रभाव होतो. त्यामुळे चांगला आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचं आहे. शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांची गरज असते, ती भागवली गेली पाहिजे. बाहेरचे तेलकट, अस्वच्छ पदार्थ खाऊ नयेत. त्यासोबतच भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवं. 

Web Title: How exercise increases your life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.