वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच फायबरचे 'हे' फायदे वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 12:38 PM2019-03-11T12:38:07+5:302019-03-11T12:38:51+5:30

फायबरयुक्त डाएट घेतल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. आतड्यांचे आरोग्य सुधारते, वजन कमी होते, हृदयाचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते. याशिवाय किडनी स्टोन आणि टाइप-2 डायबिडीजची लक्षणं कमी होण्यासही मदत होते.

How fiber diet helps in weight loss with fixing digestive system | वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच फायबरचे 'हे' फायदे वाचून व्हाल थक्क!

वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच फायबरचे 'हे' फायदे वाचून व्हाल थक्क!

Next

फायबरयुक्त डाएट घेतल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. आतड्यांचे आरोग्य सुधारते, वजन कमी होते, हृदयाचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते. याशिवाय किडनी स्टोन आणि टाइप-2 डायबिडीजची लक्षणं कमी होण्यासही मदत होते. फायबर एक असं कार्बोहायड्रेट आहे, ज्याला शरीर डायजेस्ट करू शकत नाही. खरं तर अनेक कार्बोहायड्रेट अशी असतात जी, साखरेच्या कणांमुळे नष्ट होतात. पण फायबर साखरेमुळे नष्ट होत नाही. फायबर शरीरामध्ये साखरेचे प्रमाण कंट्रोल करण्यासाठी मदत करतं. एवढचं नाही तर भूकही नियंत्रणात ठेवण्यासाठी फायबर मदत करतं. शरीराला योग्य प्रमाणात फायबर दिल्याने अनेक आजारांपासून शरीराचं रक्षणं करण्यासाठी मदत होते. फायबरमुळे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. जाणून घेऊया फायबरमुळे शरीराला होणाऱ्या फायद्यांबाबत...

द हेल्थ साइटने दिलेल्या माहितीनुसार, फायबर डाएटच्या सेवनाने शरीराचं पाचनतंत्र उत्तम होण्यासोबतच वजन कमी करण्यासाठीही फायबर डाएट मदत करतं. जर तुम्ही आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करत असाल तर तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

फायबर दोन प्रकारचे असतात...

अविघटनशील फायबर, जे खाल्लेले अन्नपदार्थ पाचनतंत्रातून जाण्यास मदत करतं आणि जे पाण्यामध्ये विरघळत नाहीत. तसेच दुसऱ्या प्रकारचं फायबर विघटनशील असतं. जे फॅट आणि लो कोलेस्ट्रॉलची लेव्हल नष्ट करण्यासाठी मदत करतात आणि पाण्यामध्ये अगदी सहज वितळतात. 

म्हणून फायबर डाएट असतं आवश्यक...

फायबरयुक्त डाएट तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असतं, कारण हे अन्न पचवण्यासाठी मदत करतं. बद्धकोष्ट, सूज आणि इर्रिटेबल बाउल सिंड्रोम यांसारख्या इतर पचनाशी निगडीत आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात. फायबरयुक्त खाद्यापदार्थ खाल्याने मुळव्याध आणि फॅटी लिव्हरच्या समस्या होण्याचाही धोका असतो. कारण फायबर पोट आणि आतड्यांमधून जातं. तसेच हे पाणी अवशोषित करतं आणि तुम्हाला बद्धकोष्टासारख्या समस्यांपासून आराम देतं. 

फायबर डाएट आणि डायबिटीज 

ज्या व्यक्ती डायबिटीजमुळे त्रस्त असतात, त्यांना आपल्या डाएटमध्ये फायबरयुक्त पदार्थांचा अवश्य समावेश करावा. कारण हे साखर शोषून घेतात आणि ब्लड शूगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतात. 

विघटनशील फायबर काय असतं?

ज्या खाद्यापदार्थांमध्ये विघटनशील फायबर असतं, ते पदार्थही शरीरासाठी फायदेशीर असतात. हे पदार्थ कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर बीन्स, ओट्स, फ्लॅक्स सीड आणि ओट ब्राव यांसारखे खाद्यपदार्थ जे विघटनशील फायबरयुक्त असतात. ते आरोग्यासाठी अनेक प्रकारचे फायदे पोहोचवतात. 

फायबर डाएट वजन कमी करण्यासाठी कसं मदत करतं?

फायबरचं सर्वात महत्त्वाचं हेल्थ बेनिफिट म्हणजे, हे वजन कमी करण्यासाठी मदत करतं. हाय फायबर फूड घेतल्याने तुमचं पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. कारण हे पोट आणि आतड्यांमध्ये असतं. हे तुम्हाला कमी खाणं आणि बराच वेळ संतुष्ट राहण्यासाठी मदत करतात. 

फायबरयुक्च खाद्य पदार्थ भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे तुम्ही ओवरइटिंगपासून दूर राहता. याचबरोबर फायबर तुम्ही ज्या पदार्थांचं सेवन करता त्यांच्यामार्फत मिळणाऱ्या कॅलरी शोषून घेण्यासाठी मदत करतात. 

Web Title: How fiber diet helps in weight loss with fixing digestive system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.