हळद शुद्ध की भेसळयुक्त?... अशी करा चाचणी घरच्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 06:24 PM2018-04-11T18:24:30+5:302018-04-11T18:24:30+5:30

हळदीतील भेसळ ओळखण्याची सोपी पद्धत

how to find adulteration in turmeric | हळद शुद्ध की भेसळयुक्त?... अशी करा चाचणी घरच्या घरी

हळद शुद्ध की भेसळयुक्त?... अशी करा चाचणी घरच्या घरी

googlenewsNext

हळद हा शब्द ऐकला की काय डोळ्यांसमोर येते ? पुढील काही वाचण्या आधी डोळे मिटून घ्या आणि बघा, ‘हळद’ म्हणून काय आठवते. कुणाला जेजुरीचा भंडारा आठवतो, कुणाला लग्नाआधीचा दिवस आठवतो. कुणाला हळदीकुंकू ठेवलेला करंडा आठवतो. बऱ्याच जणांना हळद म्हटले की टरमेरिक क्रीमच्या जाहिरातीतील पायांना हळद लावणारी सुंदरी आठवते. एकाने तर हळद म्हटले की डोळ्यांसमोर लिंबू मिरची, पसरलेली हळद आणि भात अशी भानामती, करणी, जारणमारण, काळी जादू असे प्रकार आठवतात. (टीव्ही वरील सिरियल बघण्याचे परिणाम). काही जणांना काही खरचटले, रक्त यायला लागले की ‘चेपलेली’ हळद आठवते. जुन्या काळातील डॉक्टरना हळद ही ॲंटिसेप्टिक म्हणून दिसते तर काही जणांना हळदीचे ‘पोटीस’ बांधल्याचे आठवते. हल्ली हळद आणि संगीत हे लग्नातील अविभाज्य घटक झाले आहेत. साखरपुडा, हळद, संगीत, लग्न आणि रिसेप्शन असे फाईव्ह स्टार लग्न करण्याची पद्धत रूढ होत आहे. या सर्व समारंभावर मिळून होणारा खर्च बघितला तर त्यात त्या नवदांपत्याचा संसार उभा राहू शकेल. साजरे होणारे विविध ‘डे’ज् आणि प्रत्येक ‘विधी’ चे साजरे होणे हे ‘वाढता वाढता वाढे’ होत चालले आहे. हे सर्व समाजाच्या गळी उतरविणाऱ्या व्यापाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. 

जेव्हा हुंड्याबद्दल चळवळ वाढत होती तेव्हा अनेक जण म्हणत असत, “आम्हाला परवडतो हुंडा द्यायला, आणि आवडतोही. मग आम्ही का नाही द्यायचा ? ज्यांना परवडत नाही त्यांनी देउ नये. पण हुंडाबंदी कायदा ही जुलुमशाही आहे”. ज्यांना या तर्कांमागील सामाजिक धोके दिसतील त्यांना या पसरट समारंभामधील धोके पण दिसतील.

हे विषयांतर झालं. आपण जी हळद सौभाग्यलक्षण म्हणून, नवरा-नवरीला संस्कार म्हणून, लागल्या खुपल्याला घरगुती उपाय म्हणून किंवा सौंदर्यप्रसाधने म्हणून वापरतो ती शुद्ध आहे की भेसळयुक्त आहे हे कधी बघतो का? बरे या तपासणीसाठी हळदीचे सॅम्पल कुठे लॅबोरेटरीत पाठवायची पण गरज नाही. साधी सोपी घरगुती टेस्ट आहे. एका ग्लासात किंचित कोमट केलेले पाणी घ्यायचे. त्यात थोडी हळद घालायची. मग बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये जायचे. तिथे स्वच्छता राखण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड असते, त्यातील पाच-सहा थेंब हळद मिसळलेल्या पाण्यात टाकायचे. पाणी ढवळून त्या पाण्याकडे बघायचे. झाली टेस्ट. तुम्हाला लगेच कळेल की हळदीत भेसळ आहे की हळद शुद्ध आहे. 

जर भेसळ असेल तर आपल्याला किती वेळ आहे जवळ त्यानुसार, FDA कडे तक्रार करायची, जिथून हळद घेतली तिथे जाऊन गर्दीच्या वेळेस हा प्रयोग करायचा, ( या मुळे लोकशिक्षण पण होते आणि वाणी पण तुम्हाला थोडा बिचकून राहतो) किंवा दुसरीकडून हळद आणायची आणि पुन्हा टेस्ट करून मग वापरायची.
 

Web Title: how to find adulteration in turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य