रोजच्या जगण्यात 'हे' बदल करून पाठीचं दुखणं कायमचं दूर ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 05:41 PM2020-03-22T17:41:16+5:302020-03-22T17:49:48+5:30

साधारणपणे ३० ते ४० या वयोगटात ही समस्या जास्त जाणवते.

How get relief from back pain by changing daily habbits myb | रोजच्या जगण्यात 'हे' बदल करून पाठीचं दुखणं कायमचं दूर ठेवा

रोजच्या जगण्यात 'हे' बदल करून पाठीचं दुखणं कायमचं दूर ठेवा

Next

सध्याच्या काळात जीवनशैलीशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काहीजण रोज ८ ते १० तास बसून काम करत असतात. त्यामुळे पाठीच्या दुखण्याची समस्या उद्भवत असते. रोजच्या जगण्यातील काही गोष्टींमध्ये बदल करून तुम्ही  कमरेचे किंवा पाठीचं दुखणं दूर करू शकता.

साधारणपणे ३० ते ४० या वयोगटात  ही समस्या जास्त जाणवते. तज्ञांच्यामते आपण जेव्हा कोणतंही काम करत असतो किंवा बसत असतो. तेव्हा आपल्या पोजीशन आणि पोश्चर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बसताना ताठ न बसता वाकून बसल्यामुळे अनेक समस्या उद्भवत असतात. जर तुम्ही बसून काम करत असाल तर शरीराची अधून-मधून स्टेचिंग करत रहा. जास्तीत जास्त पाणी प्या. शरीरात कॅल्शियमचं प्रमाण नियंत्रणात असू द्या. आहारात ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश करा.

कोवळं ऊन शरीरावर घ्या. त्यामुळे शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. तुम्हाला जर व्यायाम करण्याची सवय नसेल तर आधी १० मिनिट व्यायाम करायला सुरूवात करा. नंतर वेळ वाढवत जा.  पाठदुखीसाठी योगासनं हा रामबाण उपाय मानला जातो. नियमित योगा केल्यामुळे मणक्यांचे स्नायू अधिक लवचिक आणि बळकट होतात. ( हे पण वाचा-Corona virus : उन्हात बसून कोरोनापासून लांब राहता येतं? जाणून घ्या एक्सपर्ट्सचं मत)

उभं राहताना सरळ उभं रहा डोके पुढच्या बाजूस सरळ असावे, दोन्ही बाजूंनी आपले वजन समतोल राखून ठेवा. तुमचे पाय सरळ ठेवा आणि आपले डोके मणक्याच्या रेषेमध्ये सरळ असावे. त्यामुळे तुमचं शरीर  चांगलं राहिल. त्याचप्रमाणे फ्लॅट शूज वापरल्याने पाठीवर कमी ताण येतो.वस्तू उचलताना गुडघ्यात वाका, पाठ सरळ ठेवा व वस्तू शरीराजवळून उचला. एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका. नियमित वेळाने बसण्याची स्थिती बदला, पाठ सरळ करा किंवा फिरून या. चुकीच्या स्थितीत झोपू नका. कुशीवर झोपताना कंबरेला आधार मिळेल, अशा पद्धतीने पातळ उशीचा उपयोग करा. हे बदल रोजच्या जीवनात केल्यास  पाठीचं दुखणं कमी होईल. ( हे पण वाचा- Corona virus : हळदीच्या दुधाचे सेवन करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा आणि आजारांचं टेंशन विसरा.....)

Web Title: How get relief from back pain by changing daily habbits myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.