गॅस आणि अॅसिडीटीपासून कशी मिळवाल सुटका?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 01:46 PM2018-04-27T13:46:03+5:302018-04-27T14:32:30+5:30

गॅसपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

How to get relief from gas and acidity? | गॅस आणि अॅसिडीटीपासून कशी मिळवाल सुटका?

गॅस आणि अॅसिडीटीपासून कशी मिळवाल सुटका?

मुंबई : माणसाच्या आनंदाचा मार्ग पोटतून जातो, असे म्हटले जाते. मात्र, याच आनंदावर विरझन घालण्याचे काम पोटातील गॅस करतो. अनेकांना गॅसच्या समस्येने ग्रासलेले असते. वरवर पाहता गॅस ही किरकोळ वाटणारी गोष्ट आहे. मात्र, ती दिसते तितकी सर्वसामान्य नाही. म्हणूनच गॅसपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

– कार्बोनेटेड ड्रिक आणि वाईन अशा पेयांचे सेवन टाळा. कारण अशा प्रकारची पेये पदार्थ पोटात कार्बन डायऑक्साईड निर्माण करते.

– एखादे पेय जर ‘स्ट्रॉ’ने प्यायची तुम्हाला सवय असेल तर, ती बंद करा. अगदी साधेपणाने ग्लासचाच वापर करा.

– भूकेपेक्षा जास्त आणि मसालेदार जेवण टाळा.

– तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. अती तणाव हेही पोटात गॅस तयार होण्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे तणावाला थोडासा दूरच ठेवा.

– जास्त वेळ उपाशी राहू नका. जास्त वेळ उपाशी राहिल्यानेही पोटात गॅस होतो. लक्षात ठेवा तुम्ही भोजनास जितका वेळ लावाल आणि तुमचे पोट रिकामे ठेवाल तितका वेळ तुमच्या पोटात गॅस निर्माण होईल.

– जेवल्यानंतर लगेच झोपू नका. थोडा वेळ चालत रहा. त्यामुळे पचनक्रियेला चालना मिळते. तसेच, असे केल्याने पोटही फुगत नाही.

अत्यंत साधे व घरी करता येण्यासारखे हे उपाय आहेत. त्यामुळे आपण थोडे लक्षपूर्वक हे उपाय केल्यास आपल्याला गॅसपासून मुक्तता मिळण्यास चांगलीच मदत होऊ शकते.

Web Title: How to get relief from gas and acidity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.