लोक दूर पळण्याच्या आधी करा काखेतली दुर्गंधी दूर, त्वरित करा 'हे' जबरदस्त अन् सोपे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 12:22 PM2021-08-23T12:22:51+5:302021-08-23T12:29:23+5:30
शरीराला येणारा विशेषतः काखेतील घाम उपाय नक्की काय आहेत हे जाणून घेणं बऱ्याच जणांना महत्त्वाचं वाटतं. तुम्हालाही काखेत घाम येऊन दुर्गंधी जाणवत असेल तर तुम्ही हे सोपे आणि सहज उपाय नक्कीच करू शकता.
शरीराला येणारा विशेषतः काखेतील घाम उपाय नक्की काय आहेत हे जाणून घेणं बऱ्याच जणांना महत्त्वाचं वाटतं. काखेत घाम आल्यास त्यावर नैसर्गिक उपायही तुम्हाला करता येतात. या लेखातून सोपे घरगुती उपाय देण्यात आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्हालाही काखेत घाम येऊन दुर्गंधी जाणवत असेल तर तुम्ही हे सोपे आणि सहज उपाय नक्कीच करू शकता. डॉ. पी. पद्मजा यांनी ओन्लीमायहेल्थ या वेबसाईटला काखेत घाम येण्याची कारणे व उपाय सांगितले आहेत.
काखेत घाम कशामुळे येतो?
घामामुळे येणारा शरीराचा दुर्गंध (विशेषतः काखेतील घामाचा दुर्गंध) मुख्यत्वे अपोक्राईन ग्रंथीशी जोडलेला आहे. घाम येणे ही प्रक्रिया शरीरासाठी चांगली आहे. मात्र यातून येणारा दुर्गंध हा आपल्या त्वचेमध्ये जीवाणू उत्पन्न करू लागतो. या जीवाणूंमुळेच आपल्या शरीरामध्ये येणाऱ्या घामातून दुर्गंध येतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक गंध असतो जो त्याच्या खाण्यापिण्याच्या आणि स्वास्थ्य आणि लिंगानुसार अवलंबून असतो. काखेत इतर शरीरापेक्षा जास्त घाम येतो. त्यामुळे दुर्गंधीही जास्त येते. सतत हात खाली असल्याने हा घाम तिथेच साचून राहातो. त्यामुळे काही काही वेळाने सतत काखेत येणारा घाम हा टिश्यू पेपरने पुसत राहायला हवा. बॅक्टेरियाद्वारे घामाची क्रिया होताना दोन प्रकारचे अॅसिड असतात एक म्हणजे प्रोपेनोईक अॅसिड आणि दुसरं आयसोवलरिक अॅसिड. याशिवाय घामाच्या ग्रंथीही शरीरामध्ये उपलब्ध असतात. त्यामुळेच घामाचा वास येतो. पण त्यावर अनेक घरगुती उपाय आहेत. ते करून तुम्ही घामाची ही दुर्गंधी घालवू शकता.
काखेतून घामाचा दुर्गंध येऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?
- दिवसातून दोन वेळा स्वच्छ आंघोळ करा
- चांगला अँटिबॅक्टेरियल साबण वापरा
- प्रत्येक आंघोळीनंतर अंग पुसायला स्वच्छ टॉवेल वापरा
- चांगले डिओड्रंट वापरा
- नैसर्गिक कॉटन अथवा लोकरीचे कपडे वापरा आणि घट्ट कपड्यांचा वापर जास्त करू नका
- काखेतील केस नेहमी काढून टाका. त्यामुळे दुर्गंधी जास्त येते. केसात घाम साचून राहातो. त्यामुळे केस काढून टाका
- कांदा कमी प्रमाणात खा
- फळं आणि भाजी या खाण्यावर जास्त भर द्या
- भरपूर प्रमाणात पाणी प्या