शरीरातून High Cholesterol गायब करून टाकेल हा एक मसाला, लगेच सेवन करा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 10:08 AM2023-10-28T10:08:10+5:302023-10-28T10:08:52+5:30

Ginger Can Reduce Bad Cholesterol: हाय कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी तुम्ही आल्याला वापर करू शकता. यात जिंजोरल आणि शोगोल नावाचे अॅंटी-ऑक्सिडेंट असतात.

How ginger can help in lowering bad cholesterol | शरीरातून High Cholesterol गायब करून टाकेल हा एक मसाला, लगेच सेवन करा सुरू

शरीरातून High Cholesterol गायब करून टाकेल हा एक मसाला, लगेच सेवन करा सुरू

Ginger Can Reduce Bad Cholesterol: आजकाल अनेकांना बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या होत आहे. कोलेस्ट्रॉल नसांमध्ये जमा झाल्याने अनेक गंभीर समस्या होतात. इतकंच काय तर जीवाला धोकाही होऊ शकतो. धमण्यांमध्ये प्लाक जमा झाल्याने नसा ब्लॉक होतात. अशात हृदयाला व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही. यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. अशात हाय कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी तुम्ही आल्याला वापर करू शकता. यात जिंजोरल आणि शोगोल नावाचे अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. चला जाणून घेऊ कसा करायचा याचा वापर.

1) कच्चं आलं

आलं तुम्ही कच्च चाऊन खाऊ शकता. हे अशा लोकांसाठी फार गरजेचं आहे जे लोक तळलेले आणि तिखट पदार्थ अधिक खातात. कारण आल्याची टेस्ट जिभेला झोंबते, त्यामुळे लोक कच्चं आलं कधी खात नाहीत. पण ही पद्धत कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फार फायदेशीर आहे. 

2) आल्याचं पाणी

जे लोक नियमितपणे आल्याच्या पाण्याचं सेवन करतात त्यांना या मसाल्याचा भरपूर फायदा मिळतो. याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. यासाठी आल्याचे छोटे छोटे तुकडे कापून पाण्यात उकडून घ्या. नंतर हे पाणी कोमट झाल्यावर सेवन करा. जेवण करतानाही तुम्ही याचं अर्धा कप पाणी पिऊ शकता.

3) आलं आणि लिंबाचा चहा

जे लोक नियमितपणे आल्याच्या चहा पितात त्यांच्या शरीरातील फॅट हळूहळू कमी होतं आणि सोबतच बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होतं. जे लोक जास्त तेलकट आणि तिखट खातात त्यांच्यासाठी हा चहा फायदेशीर ठरतो.

4) आल्याचं पावडर

आलं जास्त काळ स्टोर करून ठेवण्यासाठी आल्याचे तुकडे करून वाळवून घ्या. हे मिक्सर ग्राइंडरमध्ये चांगले बारीक करा आणि त्यांचं पावडर तयार करा. हे पावडर तुम्ही पाण्यात मिक्स करून किंवा काही पदार्थांमध्ये टाकून सेवन करू शकता.

5) आलं आणि लसणाचा काढा

आलं आणि लसूण मिक्स करून याचा काढा तयार करा आणि तो नियमित सेवन करा. याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास भरपूर मदत मिळते. जर हा काढा थोडा कडवट लागला तर त्याता लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका.

Web Title: How ginger can help in lowering bad cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.