आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी, जाणून घ्या सेवनाची पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 04:44 PM2024-09-18T16:44:58+5:302024-09-18T16:45:34+5:30

यूरिक अ‍ॅसिड कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. जवळपास सगळ्याच किचनमध्ये मिळणारी एक गोष्टी ही समस्या दूर करू शकते.

How Ginger Reduce Uric Acid, Know how to use it | आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी, जाणून घ्या सेवनाची पद्धत!

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी, जाणून घ्या सेवनाची पद्धत!

Is Ginger Good For Reducing Uric Acid: आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे अनेकांना ही समस्या होते. जेव्हा शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढतं तेव्हा सांधे, जॉईंट्समध्ये वेदना आणि सूज अशा समस्या होतात. जर वेळीच यावर उपचार केले नाही तर ही समस्या आणखी वाढू शकते. यूरिक अ‍ॅसिड कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. जवळपास सगळ्याच किचनमध्ये मिळणारी एक गोष्टी ही समस्या दूर करू शकते. ही गोष्ट म्हणजे आलं. 

यूरिक अ‍ॅसिड कमी करतं आलं

आल्याच्या चहापासून ते वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समावेश केला जातो. याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच सोबच यात अनेक औषधी गुणही असतात. यातील अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-ऑक्सि़डेंट ने शरीरातील सूज कमी होते. तसेच आल्याने पचनक्रियाही चांगली होते. शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघण्यास मदत मिळते.

आलं कसं करतं काम?

आल्यामध्ये जिंजरोल्स नावाचं एक शक्तीशाली तत्व असतं, जे शरीरात यूरिक अ‍ॅसिड जमा होण्यापासून रोखतं. हे तत्व यूरिक अ‍ॅसिडचे क्रिस्टल बनण्याची प्रक्रिया हळूवार करतं. ज्यामुळे जॉईंट्समध्ये वेदना आणि सूज कमी होते. तसेच याच्या मदतीने शरीरात रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो. इतकंच नाही तर शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघतात. 

आल्याचं सेवन करण्याची योग्य पद्धत

आल्याचं सेवन वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता. मात्र, याचा योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. तेच जाणून घेऊया...

आल्याचा चहा

आल्याचा चहा यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी एक बेस्ट उपाय आहे. यासाठी ताज्या आल्याचे छोटे-छोटे तुकडे करा आणि ते पाण्यात उकडून घ्या. तुम्हाला हवं तर तुम्ही यात थोडं मध आणि लिंबाचा रसही टाकू शकता. याच चहाचं दिवसातून दोन वेळा सेवन करा.

आलं आणि हळदीचं मिश्रण

आलं आणि हळद दोन्हींमध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात. या दोन्हींचं मिश्रण करून एक पेस्ट बवा आणि ही पेस्ट कोमट पाण्यात टाकून सेवन करा. याने यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत मिळते.

आल्याचा रस

ताज्या आल्याचा थोडा रस काढून त्यात थोडा लिंबाचा रस टाका. हा रस सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. याने शरीर आतून डिटॉक्स होईल आणि यूरिक अ‍ॅसिडही कंट्रोल होईल. 

आल्याचं तेल

आल्याचा तेलाचा सुद्धा तुम्हाला जॉईट्समधील सूज आणि वेदना कमी करण्यास करू शकता. या तेलाने जॉईंट्सवर हलक्या हाताने मालिश करा. याने ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं आणि वेदनाही कमी होतात.

काय काळजी घ्या?

- आल्याचं जास्त सेवन केल्याने पोटात जळजळ होऊ शकते. त्यामुळे याचं सेवन कमी प्रमाणात करा. 

- जर तुम्हाला आरोग्यासंबंधी एखादी गंभीर समस्या असेल तर आल्याचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

- आल्याचं सेवन करताना पुरेसं पाणीही प्या. जेणेकरून शरीरात पाण्याची लेव्हल संतुलित राहील.

Web Title: How Ginger Reduce Uric Acid, Know how to use it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.