थंडीमध्ये पॅनिक अटॅकचा वाढता धोका; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 03:27 PM2019-01-01T15:27:35+5:302019-01-01T15:27:45+5:30
पॅनिक अटॅक आल्यामुळे व्यक्ती खूप घाबरते. हा एक प्रकारचा एंग्जायटी डिसऑर्डर आहे. परंतु, यामध्ये व्यक्ती फार घाबरून जातात.
पॅनिक अटॅक आल्यामुळे व्यक्ती खूप घाबरते. हा एक प्रकारचा एंग्जायटी डिसऑर्डर आहे. परंतु, यामध्ये व्यक्ती फार घाबरून जातात. पॅनिक अटॅक येणामागे मेंदूमध्ये होणारं असंतुलन, अल्कोहोल इत्यादींच सेवन करणं, सतत तणावात राहणं तसेच बऱ्याचदा जेनेटिक कारणांमुळेही पॅनिक अटॅक येतात. काही इतर व्यक्ती किंवा तुमच्या परिचयाच्या व्यक्तींना जर पॅनिक अटॅक आला तर तुम्हाला त्यांची मदत करावी लागू शकते. त्यासाठी सर्वात आधी पॅनिक अटॅकबाबत तुम्हाला योग्य ती माहीती करून घेणं आवश्यक असतं.
पॅनिक अटॅकची लक्षणं शरीराच्या इतर समस्यांमुळेही उद्भवू शकतात. हृदय रोग, अस्थमा, श्वासनाशी निगडीत समस्या, हार्मोन्समध्ये असंतुलन, एखादा संसर्गजन्य रोग किंवा रक्तामध्ये झालेलं एखादं केमिकल इन्फेक्शन हीदेखील पॅनिक अटॅक येण्याची लक्षणं ठरू शकतात. काही औषधांचा विपरित परिणामही पॅनिक अटॅक येण्याचं कारण ठरू शकतं.
काय आहे पॅनिक अटॅक?
अचानक एखाद्या गोष्टीची भिती वाटल्यामुळे, बरेच दिवस एखाद्या तणावामध्ये राहिल्यामुळे पॅनिक अटॅक येतात. पॅनिक अटॅक कोणत्याही परिस्थितीमध्ये येऊ शकतात. हे कधी एंग्जाइटी डिसॉर्डर, पॅनिक डिसॉर्डर, सामाजिक भय किंवा एखाद्या गोष्टीबाबत असलेल्या फोबियामुळेही येऊ शकतात. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वेगाने होतो. तसेच अनेकदा खूप भिती वाटल्यामुळे शरीर थरथरू लागतं.
पॅनिक अटॅकची लक्षणं
- श्वास घेण्यासाठी त्रास होणं
- हृदय आणि छातीमध्ये वेदना होणं.
- हृदयाची धडधड वाढणं
- खूप घाम येणं
- सतत धाप लागणं
- पोटाच्या समस्या उद्भवणं
- सतत थकवा येणं
पॅनिक अटॅकला हार्ट अटॅक समजू नका
पॅनिक अटॅक आलेल्या व्यक्तीची परिस्थिती हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीप्रमाणे होते. परंतु यामध्ये वेदना होत नाहीत. पॅनिक अटॅक आणि हार्ट अटॅक दोन्हींमध्ये एड्रेनेलिन हॉर्मोन स्त्रवतात. त्यामुळे अनेकदा हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये फरक करणं अवघड होतं.
पॅनिक अटॅक कधी येतो?
सतत मानसिक तणावामध्ये राहिल्याने मनामध्ये भिती निर्माण होते परिणामी पॅनिक अटॅक येतात. तपासणी आणि योग्य उपचारानंतर समजतं की, ही समस्या अचानक उद्भवलेली समस्या आहे. पॅनिक अटॅक आल्यानंतर अनेकदा श्वास घेण्यासाठी त्रास, हृदयाचे ठोके वाढणे आणि छातीत वेदना यांसारख्या समस्या उद्भवतात. परंतु याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.