कोरोनाची लस घेण्याआधीच इम्यूनिटी वाढवण्याचे तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय; वेळीच माहीत करून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 10:41 AM2021-01-31T10:41:59+5:302021-01-31T10:44:49+5:30

CoronaVirus News & latest Updates : जगभरात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस हा एकमात्र उपाय असल्याचे सांगितले जात आहे.

How to improve your immune response to the covid-19 vaccine shot by expert | कोरोनाची लस घेण्याआधीच इम्यूनिटी वाढवण्याचे तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय; वेळीच माहीत करून घ्या

कोरोनाची लस घेण्याआधीच इम्यूनिटी वाढवण्याचे तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय; वेळीच माहीत करून घ्या

Next

कोरोनाव्हायरसनं गेल्या एका वर्षापासून संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोट्यावधी लोकांना कोरोनाचा सामाना करावा लागला होता. जगभरात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस हा एकमात्र उपाय असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान जगातील अनेक देशात लसीकरणाला सुरूवात  झाली आहे. ब्रिटन, रशिया आणि अमेरिकेतील  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मद्याचे अति सेवन रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्यासाठी कारणीभूत ठरतं.  दारूचे अतिसेवन केल्यानं आतड्यांना सूज येऊन मायक्रोबायोम यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला जीवशैलीशी निगडीत काही  टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही आपली रोगप्रतिकारकशक्ती विकसित करू शकता. ओन्ली माय हेल्थशी बोलताना डॉक्टर फराह इंगळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मादक पदार्थांचे सेवन करू नका

आपल्या लसीचा शरीराला पूरेपूर फायदा व्हावा असं वाटत असेल तर  अल्कोहोल, धूम्रपान या गोष्टींपासून दूर रहा. याव्यतिरिक्त, ज्यांनी लसीचा घेतला आहे त्यांनी निरोगी जीवनशैली अवलंबणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर किंवा घेण्यापूर्वी धूम्रपान,दारू, गुटखा यासारख्या वाईट सवयी सोडणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकते.

योग्य प्रमाणात झोप घेणं

लसीच्या डोजची प्रतिक्रिया सुधारण्यासाठी भरपूर झोपे घेणे खूप महत्वाचे आहे. यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वेगानं सुधारते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ बिहेव्होरल मेडिसिनमध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार,  जे लोक रात्री पाचतासांपेक्षा जास्त झोप घेत नाहीत. त्यांच्यावर लसीचा परिणाम दिसून येण्यास विलंब लागू शकतो.

तुम्हालाही सतत तहान लागत असेल तर असू शकतो 'हा' गंभीर आजार; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

व्यायाम

नियमित व्यायाम केल्यानं शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य व्यवस्थित राहते. निरोगी जीवनशैलीमध्ये नियमित व्यायामाचा समावेश करणे फार महत्वाचे आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी होण्यासाठी वजन नियंत्रण आवश्यक आहे. यामुळे इतर समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. हे शरीरात होणार्‍या इतर गुंतागुंत कमी करते.

शिळे झाल्यानंतर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; उरलेलं अन्न खाणं ठरू शकतं घातक

ताजे अन्नपदार्थ खा

खाद्यपदार्थांमुळे  रोगप्रतिराकशक्ती लगेचच विकसित केली जाऊ शकत नाही. पण  संतुलित आहार दीर्घकाळ आजारांपासून लांब ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. निरोगी राहण्यासाठी शरीराला अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. अशा स्थितीत आहारात हिरव्या भाज्या, फळं, दही या खाद्यपदार्थांचा समावेश करायला हवा. 

Web Title: How to improve your immune response to the covid-19 vaccine shot by expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.