वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर आहे ज्यूस फास्टिंग?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 11:18 AM2019-01-11T11:18:54+5:302019-01-11T11:20:44+5:30
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट माहीत असतील. कधी खायचं तर खायचं नाही, अशा वेगवेगळ्या डाएट असतात.
(Image Credit : theveganweightlossdiet.com)
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट माहीत असतील. कधी खायचं तर खायचं नाही, अशा वेगवेगळ्या डाएट असतात. पण एक डाएट अशी आहे ज्याची नेहमीच चर्चा होत असते. ती म्हणजे ज्यूस फास्टिंग. पण ज्यूस फास्टिंग करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. ज्यूस फास्टिंग करण्याआधी याचा परिणाम आणि ही कुणी करावं, कुणी करु नये याबाबत जाणून घ्यायला हवं.
तसे तर वेगवेगळ्या भाज्यांचे आणि फळांचे ज्यूस शरीरासाठी फायदेशीर असतात. पण केवळ ज्यूसवर राहणे कठीण काम आहे. ज्यूसमध्ये व्हिटॅमिन, खनिज असतात, पण शरीरासाठी इतरही पोषक तत्त्वे गरजेचे असतात. त्यामुळे ज्यूस फास्टिंग करण्याची पद्धतही योग्य तज्ज्ञांकडून जाणून घेतली पाहिजे.
ज्यूस फास्टिंग वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानली जाते. कारण याने शरीर हलकं, हायड्रेटेड आणि पौष्टिक तत्त्वांनी भरलं जातं. काही लोकांचा असा विचार आहे की, ज्यूस फास्टिंग केल्याने कॅन्सर रोखला जातो, अशा कोणत्याही संशोधनात सांगण्यात आलेलं नाहीये.
ज्यूस फास्टिंग करण्याची पद्धत
ज्यूस फास्टिंग करण्यासाठी तुम्हाला काही भाज्या आणि फळांची निवड करावी लागेल. ज्या भाज्या आणि फळांवर कमी रासायनिक क्रिया होते आणि कीटकनाशकांचा कमी वापर होतो अशा भाज्या-फळे निवडा. भाज्यांच्या ज्यूसच्या तुलनेत फळांच्या ज्यूसचा अधिक समावेश करा. जे ज्यूस तुम्ही घेत आहात त्यात न्यूट्रिएंट्स भरपूर असावेत. त्यात फार जास्त शुगर असू नये. ज्यूस फास्टिंग इतर आहाराप्रमाणे आपल्या शरीरावर काम करत नाही.
कुणी करावं ज्यूस फास्टिंग?
ज्यूस फास्टिंग हे सर्वांसाठीच नाहीये. कारण अनेकदा केवळ ज्यूसवर राहिल्याने अॅसिडिटी, डोकेदुखी, गॅस आणि पोटदुखीची समस्या होऊ शकते. त्यामुळे ज्यूसचा आपल्या आहारात समावेश करतेवेळी याची काळजी घ्यावी लागेल की, वजन कमी होण्याऐवजी वाढू नये. काहीही चूक झाल्यास रक्तातील शुगरचं प्रमाण वाढू शकतं. लहान मुलं, गर्भवती महिला, वयोवृद्ध आणि कमजोर लोकांनी ज्यूस फास्टिंग अजिबात करु नये. शिवाय जे करताहेत त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावी.
ज्यूस फास्टिंगमुळे होणारा त्रास
ज्यूसमुळे आपल्या शरीरातील विषारी केमिकल्स बाहेर निघून टॉक्सिन केलं जातं. सुरुवातीच्या काही दिवसात थकवा जाणवेल. काहींना पोटदुखी, लो ब्लड प्रेशर आणि चक्कर येणे या समस्या होऊ शकतात. त्यामुळे वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
स्मरणशक्तीलाही होतो फायदा
एका शोधातून समोर आले आहे की, जे पुरुष हिरव्या पाले भाज्या, गर्द केशरी आणि लाल रंगाच्या भाज्या, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि ब्लूबेरी यांसारखे फळं खातात तसेच संत्र्याचा ज्यूस पितात त्यांना म्हातारपणात स्मरणशक्ती गमावण्याचा धोका कमी असतो. या शोधाच्या निष्कर्षातून हे समोर आलं आहे की, जे पुरुष वृद्धापकाळाच्या २० वर्षांआधी म्हणजेच तरुण असतानाच जास्तीत जास्त प्रमाणात फळं आणि भाज्या खातात, त्यांना विचार आणि स्मरणशक्तीशी निगडीत समस्या कमी होतात. नंतर त्यांनी फळं खाल्ली नाही तरी चालेल. जे पुरुष जास्तीत जास्त भाज्यांचं सेवन करतात, त्यांच्यातील विचारशक्ती अधिक मजबूत होऊ शकते.
अभ्यासकांना आढळले की, जे पुरुष रोज संत्र्याच्या ज्यूस पितात, त्यांची विचारशक्ती संत्र्याचा ज्यूस न पिणाऱ्यांच्या तुलनेत ४७ टक्के जास्त विकसीत असते. जे महिन्यातून एकदाही संत्र्याचा ज्यूस पित नाहीत, त्यांना स्मरणशक्ती संबंधी समस्या होऊ शकतात.
हॉवर्ड यूनिव्हर्सिटीच्या बॉस्टन येथील टी.एच.चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे चांगझेंग यूआन म्हणाले की, 'या शोधाची सर्वात चांगली बाब ही होती की, आम्ही यात सहभागी लोकांचा २० वर्ष अभ्यास केला. त्यांचं निरीक्षण केलं. आमच्या शोधातून याबाबत ठोस पुरावे समोर आले आहेत की, मेंदु निरोगी ठेवण्यासाठी आहार महत्त्वाचा आहे'.