कसं ठेवायचं स्वत:ला शांत, समाधानी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 07:09 PM2017-10-27T19:09:43+5:302017-10-27T19:11:27+5:30
सर्वात आधी आपल्या अपेक्षांना लगाम घाला..
- मयूर पठाडे
कसं ठेवायचं स्वत:ला शांत, समाधानी? आपली रोजची टेन्शन्स बाजूला ठेवा आणि सुखा-समाधानानं आयुष्य जगा, असं सारेच सांगतात. आजारी पडल्यावर, धातीत साधं धडधडलं तरी डॉक्टर पहिल्यंदा हाच प्रश्न विचारतात, तुम्हाला काही टेन्शन आहे का? खरंतर कसं आणि काय द्यायचं या प्रश्नाचं उत्तर?
टेन्शन्स कोणाला नसतात? आणि असली तरी आता त्याचं तुलनात्मक प्रमाणही बघायला हवं. आपल्यापेक्षा हजार टेन्शन्स असलेली लोकं आणि त्यांचं रोजचं शेड्यूल आपण बघत असतो, पण त्या तुलनेत आपल्याला जे ताण-तणाव आहेत, त्याला टेन्शन असं म्हणायचं तरी कसं?
पण तुम्हाला कुठलंही आजारपण आलं किंवा जाणवायला लागलं, त्यातही हृदय आणि छातीच्या संदर्भातलं, मग ते साधं ब्लड प्रेशर का असेना, तरी त्याला सारे जण एकच उपाय सांगतात. टेन्शन्स कमी करा!
कसं करायचं हे टेन्शन कमी?
मुंबईतील डॉक्टरांच्या एका संघटनेनं नुकतंच त्यासंबंधी लोकांचं प्रबोधन केलं.
काय आहे त्यांचं म्हणणं?
आपल्या गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेूऊ नका.
आपली क्षमता बघा आणि त्यानुसारच धावपळ करा.
अर्थात क्षमता असली तरी, जास्त धावपळ केलीत, जास्त हव्यास केला, तर तुमच्या हृदयावर, तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होईलच.
स्वत:ला स्वस्थचित्त ठेवा.
रोज नियमित व्यायाम करा.
स्वत:साठी काही वेळ अवश्य राखून ठेवा.
मुलांमध्ये खेळा.
त्यांच्यात मन रमवा.
ठराविक साच्यातून स्वत:ला बाहेर काढा.
निसर्गाच्या सान्निध्यात जा
आणि वर्तमानात जगा..
अशा प्रकारचे अनेक उपाय त्यांनी सांगितलेत.
त्यातले सगळे जरी करता नाही आले, तरी आजपासूनच सुरुवात करा. काही सोप्या उपायांपासून सुरुवात करा. त्यानंही परिणाम दिसेल..
करुन पाहायला काय हरकत आहे?