दिवाळीत बेसनाचे लाडु करताय? अशी ओळखा बेसनपीठातील भेसळ, FSSAI ने सांगितली सोपी ट्रीक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 02:20 PM2021-10-31T14:20:30+5:302021-10-31T17:15:54+5:30
दिवाळीसारख्या सणात बेसनपीठाची विक्री जास्त होत असल्याने त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता जास्त आहे. FSSAI (फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथोरिटी ऑफ इंडिया) ने भेसळयुक्त बेसन (Adulterated gram flour) ओळखण्यासाठी एक पद्धत आपल्या ट्विटर हँडलवर शेयर केली आहे.
सणासुदीच्या काळात भेसळयुक्त वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. दिवाळीसारख्या सणात बेसनपीठाची विक्री जास्त होत असल्याने त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता जास्त आहे. FSSAI (फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथोरिटी ऑफ इंडिया) ने भेसळयुक्त बेसन (Adulterated gram flour) ओळखण्यासाठी एक पद्धत आपल्या ट्विटर हँडलवर शेयर केली आहे.
FSSAI नुसार, भेसळखोर जास्त नफा कमावण्यासाठी बेसनात खेसारी डाळीपासून बनवलेले पीठ मिसळतात, ज्यामुळे बेसन पहिल्यासारखे शुद्ध राहात नाही आणि त्यामधील पोषकतत्व शरीराला मिळू शकत नाहीत.
परंतु एका सोप्या ट्रिकने ही भेसळ तुम्ही ओळखू शकता. यासाठी प्रथम एक टेस्ट ट्यूबमध्ये एक ग्रॅम बेसन घ्या. यानंतर टेस्ट ट्यूबमध्ये ३ मिली पाणी टाका. आता तयार सोल्यूशनमध्ये २ एमएल कॉन्सेनट्रेटेड एचसीअल मिसळा. यानंतर टेस्ट ट्यूब चांगल्या प्रकारे हलवा आणि सोल्यूशन पूर्णपणे मिसळू द्या.
Detecting Besan adulteration with Khesari dal flour.#DetectingFoodAdulterants_12#AzadiKaAmritMahotsav@jagograhakjago@mygovindia@MIB_India@PIB_India@MoHFW_INDIApic.twitter.com/JOvLhBDqfR
— FSSAI (@fssaiindia) October 27, 2021
टेस्ट ट्यूबमधील बेसन जर शुद्ध असेल तर सोल्यूशन रंग बदलणार नाही. जर सोल्यूशनच्या पृष्ठभागावर गुलाबी रंग दिसू लागला तर समजून जा की बेसनपीठात भेसळ आहे. कारण असे मेटानिल पिवळ्या रंगावर एचसीएलच्या रिअॅक्शनमुळे होते. दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळेच सोल्यूशनचा पृष्ठभाग गुलाबी दिसू लागतो.