भेसळयुक्त तेल म्हणजे विष! कसे ओळखाल तुमचे तेल भेसळयुक्त आहे? वापरा 'या' सोप्या ट्रिक्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 02:55 PM2021-10-10T14:55:25+5:302021-10-10T14:58:53+5:30
आपण स्वयंपाक घरात वापरत असलेले तेल खरे आहे की बनावट आहे हे आपल्याला शोधणे खूप कठीण आहे. परंतु आम्ही तुम्हाला काही अशा ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील तेल बनावट आहे की, खरे आहे हे अगदी काही मिनिटात ओळखू शकतात.
आपल्याला स्वयंपाकात कोणताही पदार्थ बनवायाचा झाला की, तेलाची गरज लागते. बिना तेलाचे खूप कमी पदार्थ बनतात. परंतु इतर पदार्थात आपल्याला तेल घालावेच लागते. त्याशिवाय जेवणाला देखील चव येत नाही. जास्त प्रमाणात तेल खाल्याने आपल्या शरीरासाठी ते हानिकारक आहे. त्यात जर तुम्ही भेसळयुक्त किंवा बनावट तेल तुमच्या नेहमीच्या जेवणात वापरलात तर ते तेल तुमच्यासाठी विषापेक्षा कमी नाही. परंतु आजकाल भेसळयुक्त तेल बाजारात झपाट्याने विकले जात आहे. अशा परिस्थितीत आपण स्वयंपाक घरात वापरत असलेले तेल खरे आहे की बनावट आहे हे आपल्याला शोधणे खूप कठीण आहे. परंतु आम्ही तुम्हाला काही अशा ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील तेल बनावट आहे की, खरे आहे हे अगदी काही मिनिटात ओळखू शकतात.
1. तेल खरे आहे की बनावट हे ओळखण्यासाठी एका भांड्यात दोन ते तीन चमचे तेल घ्या आणि काही तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. जर तेलाच्यावर एक पांढरा थर बसला तर ते तेल बनावट असू शकते.
2. आपण ते टेस्ट ट्यूबद्वारे देखील तपासू शकता. यासाठी टेस्ट ट्यूबमध्ये तेलाचे काही थेंब टाका आणि त्यात काही थेंब नायट्रिक ऍसिड घाला आणि चांगले मिक्स करा. आता ही ट्यूब गरम करा आणि मिश्रणाचा रंग पहा. जर रंग बदलला तर तेलात भेसळ आहे.
3.तेलाचे काही थेंब आपल्या तळहातावर ठेवा आणि त्याला हातावर जोरात घासा आणि पुन्हा वास घ्या जर त्यातून रंग बाहेर आला किंवा रसायनाचा वास आला, तर त्यात भेसळ झाली आहे असं समजा.
4. तुम्ही चव घेऊन मोहरीच्या तेलाचा अंदाज लावू शकता ते खरे आहे की बनावट. जर तेलाची चव जास्त कडू नसले किंवा काळी मिरीसारखी असेल, तर याचा अर्थ तेल खरे आहे आणि जर चव जास्त कडू असेल त्याला दुसरी कोणतीही चव येत नसेल तर ते बनावट असू शकते.