पुरूषांना जास्त लोणचं न खाण्याचा का दिला जातो सल्ला? वाचाल तर रहाल फायद्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 10:54 AM2024-09-14T10:54:30+5:302024-09-14T10:57:45+5:30

Pickle Side Effects : लोणचं भलेही तुमच्या जिभेचे चोचले पुरवत असलं तरी लोणचं खाल्ल्याने अनेक समस्याही होतात. खासकरून पुरूषांना लोणचं खाऊन अनेक समस्या होतात.

How lactic acid in pickles are harmful for your health | पुरूषांना जास्त लोणचं न खाण्याचा का दिला जातो सल्ला? वाचाल तर रहाल फायद्यात...

पुरूषांना जास्त लोणचं न खाण्याचा का दिला जातो सल्ला? वाचाल तर रहाल फायद्यात...

Pickle Side Effects : भारतात लोक मुख्य आहारासोबत वेगवेगळ्या चटणी आणि लोणच्यांचं सेवन करतात. आंब्याच्या आणि लिंबाच्या लोणच्याचं सेवन अधिक प्रमाणात केलं जातं. लोणच्याचं नावही काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लोणचं भलेही तुमच्या जिभेचे चोचले पुरवत असलं तर लोणचं खाल्ल्याने अनेक समस्याही होतात. खासकरून पुरूषांना लोणचं खाऊन अनेक समस्या होतात. त्याच आज आपण जाणून घेणार आहोत.

काही लोक लोणच्याचं इतकं जास्त सेवन करतात की, ते भाजी ऐवजी लोणच्या सोबतच चपाती खातात. बरेच लोक लोणच्याचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन करतात. अशा लोकांनी सावध होण्याची गरज आहे. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात लॅक्टिक अ‍ॅसिड असतं. 

काय आहे लॅक्टिक अ‍ॅसिड?

लॅक्टिक अ‍ॅसिड एक मुख्य ऑर्गेनिक अ‍ॅसिड आहे जे शरीरात असतं आणि आपल्या रक्तात आढळतं. हे अ‍ॅसिड मुख्य एनर्जी सोर्सच्या रूपात काम करतं. पण जर शरीरात याचं प्रमाण अधिक वाढलं तर अनेक समस्या होतात.

जास्त लोणचं खाल्ल्याने काय होतं?

गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका

काही रिसर्चमधून समोर आलंय की, जास्त प्रमाणात लोणचं खाणाऱ्या लोकांना गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका वाढू शकतो. सोबतच यात मिठाचं प्रमाण जास्त असल्याने ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठीही हे फार धोकादायक ठरू शकतं. हायपरटेंशनच्या रूग्णांसाठी लोणच्याचं जास्त सेवन करणं फार जास्त नुकसानकारक ठरू शकतं.

प्रिजरव्हेटिव्ह जास्त असतात

बाजारात जे लोणचं मिळतं त्या लोणच्यांमध्ये जास्त प्रिझरव्हेटिव्ह असतात आणि सोबतच या लोणच्यामध्ये जास्त असटामिप्रिड असतात, जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. असटामिप्रिक एक कार्बन आहे, जे तुमच्या सेक्शुअल लाइफमध्ये अनेक समस्या निर्माण करू शकतं. त्यामुळे या लोणच्याचं सेवन कमी प्रमाणात करावं.

कोलेस्ट्रॉल वाढतं

लोणच्याचं कमी प्रमाणात सेवन करावं. कारण जेव्हा लोणचं तयार केलं जातं तेव्हा त्यात भरपूर प्रमाणात तेल टाकलं जातं आणि सोबतच मसाल्यांचा वापर केला जातो. जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्याने आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि इतर शारीरिक समस्या वाढू शकतात.

लोणच्याने होणाऱ्या इतर समस्या

ब्लड प्रेशर वाढतं

एक्सपर्ट सांगतात की, हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी अजिबात लोणच्याचं सेवन करू नये कारण यात मिठाचं प्रमाण जास्त असतं. मिठाचं सेवन जास्त केल्याने हाय ब्लड प्रेशर वाढतं. ज्यानंतर तुम्हाला हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

वजन वाढण्याचा धोका

लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरी आणि फॅट असतात. त्यामुळे जास्त लोणचं खाल्ल्याने वजन वाढू शकतं. लठ्ठपणा वाढतो आणि मग हृदयरोगाचा धोका वाढतो.

किडनीवर पडतो वाईट प्रभाव

जास्त मीठ आणि मसाल्याचं सेवन केल्याने किडनीवर जास्त दबाव पडतो. ज्यामुळे किडन्यांचं काम हळू होतं. तुम्ही नेहमीच लोणचं जास्त खात असाल तर किडनीसंबंधी समस्या होऊ शकतात.

Web Title: How lactic acid in pickles are harmful for your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.