Underwear Expiry: अंडर गारमेंट्स कधीपर्यंत वापरू शकता? तज्ज्ञांनी केला हैराण करणारा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 01:33 PM2022-05-20T13:33:23+5:302022-05-20T13:33:55+5:30
How Long You Can Use Your Underwear: चला जाणून घेऊ की, एका अंडरविअरचा किती दिवस वापर केला जाऊ शकतो. सोबतच हेही जाणून घेऊ की, यावर तज्ज्ञांचं मत काय आहे.
How Long You Can Use Your Underwear: आपण औषधांच्या एक्सपायरीबाबत ऐकलं आहे, खाण्या-पिण्याच्या पॅक्ड पदार्थांच्या एक्सपायरी डेटबाबत ऐकलं आहे. पण तुम्ही अंडर गारमेन्ट्सच्या एक्सपायरी डेटबाबत क्वचितच ऐकलं असेल. तसा तर मेडिकली असा कोणता पुरावा नाही पण जुने अंडर गारमेन्ट्स आरोग्यासाठी धोकादायक असतात. अशात चला जाणून घेऊ की, एका अंडरविअरचा किती दिवस वापर केला जाऊ शकतो. सोबतच हेही जाणून घेऊ की, यावर तज्ज्ञांचं मत काय आहे.
NYU स्कूल ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर फिलिप टीएर्णो यांच्यानुसार, कोणत्याही अंडर गारमेंट्सची एक्सपायरी डेट नसते. पण जर अंडर गारमेंट्स सैल झाले असतील तर ते तुम्ही बदलायला हवेत.
अंडर गारमेंट्सबाबत तज्ज्ञांचा असा सल्ला असतो की, आपण अंडर गारमेंट्स एका वर्षात बदलायला हवेत. जर तुम्ही अंडर गारमेंट्स दररोज घालत असाल तर ते सहा महिन्यात बदलणं योग्य राहतं. याने अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो.
NYU च्या लांगोने हेल्थच्या एमडी टरनेह शिरजिएन यांनी सांगितलं की, आतापर्यंत असा कोणताही मेडिकल पुरावा सापडला नाही की, ज्यात हे लिहिलेलं असेल की, जने अंडर गारमेंट्स घातल्याने कोणत्याही प्रकारचं नुकसान होतं. पण जास्त जुने अंडर गारमेंट्सने अॅलर्जी आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो.
दरम्यान, जेव्हा जुने अंडर गारमेंट्स सैल होतात तेव्हा यामुळे त्यात ओलावा राहतो. त्यामुळे त्यात इन्फेक्शन पसरवणारे बॅक्टेरिया तयार होऊ लागतात. तसेच खराब अंडर गारमेंट्स घातल्याने शरीरावर रॅशेसही पडू लागतात. तसेच प्रायव्हेट पार्टमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोकाही वाढतो.