मोबाइलच्या स्क्रीनला तुम्ही किती वेळ चिकटलेले असता?

By Admin | Published: June 1, 2017 05:29 PM2017-06-01T17:29:50+5:302017-06-01T17:29:50+5:30

रात्री लाइट बंद केल्यावरही तुमचं टेक्स्टिंग सुरूच असतं? मग या ११ गोष्टी खास तुमच्याचसाठी..

How long have you been on the mobile screen? | मोबाइलच्या स्क्रीनला तुम्ही किती वेळ चिकटलेले असता?

मोबाइलच्या स्क्रीनला तुम्ही किती वेळ चिकटलेले असता?

googlenewsNext

- मयूर पठाडे

मोबाइलच्या स्क्रीनला आपण किती चिकटलेले असतो? मोबाइल जर हातातून थोडा वेळ जरी बाजूला राहिला तर आपल्याला किती अस्वस्थ होतं? उठता-बसता किती वेळा आपण मोबाइल चेक करतो? सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत किती वेळा आणि किती वेळ आपण त्यात तोंड घालून असतो? मित्र-मैत्रिणींसोबत रात्री किती वाजेपर्यंत आपण टेक्स्टिंग करत असतो? किती वेळ त्यावर व्हीडीओ पाहतो?..


विचारा स्वत:लाच. आणि आता काही वेळ तुमच्या हातातला मोबाइल जरा बाजूलाही काढून ठेवा. पाहूच नका त्याच्याकडे. तुमच्या लक्षात येईल मोबाइलच्या या स्क्रीनशिवाय आपण राहूच शकत नाही. थोडा वेळ जरी या स्क्रीनपासून आपण बाजूला गेलो तर आपल्याला अस्वस्थ वाटल्यासारखं होतंय.
तरुणांमध्ये तर या स्क्रीनचं आॅब्सेशन आहेच, पण आता हे वयही कमी कमी होत जाऊन शाळकरी मुलांच्याही हातात मोबाइल आला आहे. तेही या स्क्रीनच्या वेडाला तितकेच सरावले आणि बळी पडले आहेत.
पण ही धोक्याची घंटा आहे.

 



१- अर्थातच झोपेचं खोबरं होतं.
२- एकाग्रता कमी होते.
३- मूड सारखे बदलतात.
४- चिडचिडेपणा वाढतो.
५- खूप लवकर नैराश्य येतं.
६- स्किल्स कमी होतात.
७- होर्मोन्समध्ये बदल होतात.
८- शरीरातील इन्सुलीनचं प्रमाण कमी जास्त होतं.
९- शरीराचा एकूण समतोल, बॅलन्सच बिघडतो.
१०- आकलन क्षमता कमी होते.
११- अ‍ॅटिट्यूडवर परिणाम होतो..

Web Title: How long have you been on the mobile screen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.