अनेक तास एकाच जागी किती वेळ बसणं योग्य? डॉक्टरांनी सांगितली योग्य वेळ आणि पद्धत...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 01:33 PM2024-09-10T13:33:07+5:302024-09-10T13:33:58+5:30
कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. गीता ग्रेवाल यांनी याबाबत एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी एका व्यक्तीने किती वेळ एकाच जागी बसणं योग्य असतं याबाबत सांगितलं आहे.
अनेक तास एकाच जागी किती वेळ बसणं योग्य? डॉक्टरांनी दिला खास सल्ला...
आजकाल लोक जास्त वेळ एकाच जागी बसून काम करतात. सामान्यपणे लोक 8 ते 9 तास एकाच जाग बसून काम करतात. काम पूर्ण करण्याच्या नादात लोक तासंतास एकाच जागी बसून काम करतात. पण हे त्यांना माहीत नसतं की, असं करणं किती नुकसानकारक असतं. सतत एकाच जागी बसून काम केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. गीता ग्रेवाल यांनी याबाबत एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी एका व्यक्तीने किती वेळ एकाच जागी बसणं योग्य असतं याबाबत सांगितलं आहे.
डॉ. गीता ग्रेवाल यांच्यानुसार, 'सतत 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. एकाच जागी जास्त वेळ बसल्याने ब्लड सर्कुलेशन कमी होतं. ज्यामुळे हृदयरोग आणि डीप वेन थ्रोम्बोसिसचा धोका वाढतो.
जास्त वेळ एकाच जागी बसणं कसं टाळाल?
- 30 मिनिटे एकाच जागी बसल्यानंतर डेस्कजवळ उभे रहा आणि टाचा वर करा. बोटांवर शरीराचा सगळा भार द्या. असं केल्याने तुमचं ब्लड सर्कुलेशन योग्य राहतं आणि याने रक्ताच्या गाठीही तयार होत नाहीत.
- दर 30 मिनिटांनी तुमच्या डेस्कवरून उठून काही वेळ पायी चाला किंवा हिरव्या झाडांकडे बघा.
- 30 मिनिट ते 1 तास तुमच्या जागेवर बसून राहत असाल तर काही वेळाने छोटे छोटे वॉक करा. असं केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं.