पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी वापरा हा घरगुती फंडा; मग पाहा कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:24 AM2019-09-17T11:24:49+5:302019-09-17T11:25:18+5:30
अनेकदा आपण वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतो. त्यामध्ये दररोजच्या जेवणापासून वेगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश करतो. कधीकधी तर बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचाही आधार घेतो.
अनेकदा आपण वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतो. त्यामध्ये दररोजच्या जेवणापासून वेगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश करतो. कधीकधी तर बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचाही आधार घेतो. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही फक्त घरी तयार केलेले रोजच्या जेवणातील पदार्थ खाऊनही वजन कमी करू शकता. कसं ते जाणून घेऊया...
जर तुम्ही आहारात जास्तीत जास्त भारतीय व्यजनंचा समावेश करत असाल तर ते तुमचं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. एवढचं नाहीतर हे तुमच्या वाढलेल्या वजन कमी करण्यासोबतच तुम्हाला फिट ठेवण्यासाठीही मदत करतं. खास गोष्ट म्हणजे, तुमच्या शरीराला कोणतंही नुकसान न पोहोचवता वजन कमी करतं. कदाचित तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, घरी तयार केलेली सिम्पल करीसुद्धा तुम्हाला फिट ठेवण्यासाठी मदत करते.
लक्षात ठेवा की, घरीच तयार केलेलं जेवण चुकूनही मिस करू नका. होम मेड करी आरोग्य आणि पोषक तत्वांचा भांडार असते असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. ताज्या तयार करण्यात आलेल्या हंगामी भाज्यांचा इफेक्ट शरीरासाठी उत्तम ठरतो. फक्त योग्य पद्धतीने तयार करण्यात आल्या पाहिजे. हे तुमचं पोट बराच वेळापर्यंत भरलेलं राहतं. त्यामुळे तुम्ही ओव्हर इटिंगपासून दूर राहाता. परिणामी वजन नियंत्रणात राहतं. जाणून घेऊया आपले भारतीय पदार्थ आपलं वजन नियंत्रणात राहण्यासाठी कसे मदत करतात त्याबाबत...
जाणून घेऊया भारतीय पदार्थांच्या मदतीने वेट लॉस बूस्ट करण्यासाठी उत्तम उपाय...
भाज्या तयार करण्यासाठी हेल्दी पदार्थांचं सेवन...
भाज्या तयार करण्यासाठी अनेक लोक दही किंवा कोकनट क्रिमचा वापर करतात. जे आपल्या पोटाच्या आजूबाजूची चरबी वाढविण्याचं काम करतात. परंतु, याऐवजी जर तुम्ही नारळाचं दूध वापरलं तर चव तिच राहिल पण कॅलरी कमी होतील. परिणामी वजम अजिबात वाढणार नाही.
कढिपत्त्याचा करा आहारात समावेश
कढिपत्ता पारंपारिक जेणामधील अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे. पदार्थांची चव वाढविण्यासोबतच पदार्थ सुंदर दिसण्यासाठीही मदत करतो. कढिपत्त्याचा जर तुमच्या आहारात दररोज समावेश केला तर त्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा वाढविणारे सेल्स कमी करण्यासाठी मदत करतो. यामधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे, महानिम्बिन. शरीरातील फॅट आणि कॅलरी बर्न करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर शरीरातील लिपिड स्तर आणि ट्राइग्लिसराइड्सही कमी करतात.
मसाले वापरताना अजिबात कंजूसी करू नका
मसाले कोणतीही भाजी आणि डाळीची चव वाढविण्यासाठी मदत करतात. काही लोकांचा असा समज असतो की, हे मसाले आरोग्यासाठी चांगले नसतात. परंतु, हे खरं नाही. हळद, काळी मिरी, लाल मिरची पावडर यांसारखे मसाले जेव्हा चांगल्या फॅट्ससोबत खाण्यात येतात. जसं, तूप, मोहरीच्या तेलामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीर डिटॉक्स करण्यासोबतच शरीर रेग्युलेट करण्यासाठी मदत होते. यामुळे शरीराला अतिरिक्त फॅट्स काढणं अगदी सोप होतं.
हेल्दी फॅट्स
तूप तुमच सतत वाढणारं वजन कमी करण्यासाठी मदत करतं. यामध्ये चांगलं फॅटी अॅलिड, ओमेगा-6 असतं. जे शरीरामध्ये फॅटचा स्तर कमी करण्यासाठी आणि शरीरामध्ये लिपिड तसेच प्रोटीनचा स्तर कायम ठेवण्यासाठी मदत करतात. जेव्हा हे मसाले एकत्र येतात त्यावेळी तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं.)