पोटावरील चरबी लवकरात लवकर कमी करण्याच्या ५ स्टेप्स करून बघाच! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 10:21 AM2019-10-17T10:21:27+5:302019-10-17T10:31:25+5:30

पोटावरील चरबी कमी करण्याचे वेगवेगळे उपाय तुम्ही वाचत असता. पोटावरील चरबी कमी करण्यात आणि वजन कमी करण्यात काही गोष्टींचा फरक असतो.

How to lose weight and belly fat in 2 months? | पोटावरील चरबी लवकरात लवकर कमी करण्याच्या ५ स्टेप्स करून बघाच! 

पोटावरील चरबी लवकरात लवकर कमी करण्याच्या ५ स्टेप्स करून बघाच! 

Next

(Image Credit : thesun.co.uk)

पोटावरील चरबी कमी करण्याचे वेगवेगळे उपाय तुम्ही वाचत असता. पोटावरील चरबी कमी करण्यात आणि वजन कमी करण्यात काही गोष्टींचा फरक असतो. तुम्हाला वाटत असेल की, पोटावरील चरबी तुम्ही काही दिवसातच कमी करू शकाल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. तुम्हाला साधारण २ महिने वेळ लागेल, यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. पाच वेगवेगळ्या टप्प्यांच्या माध्यमातून तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता. खालील ५ टप्प्यांच्या मदतीने तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता.

पहिला टप्पा

(Image Credit : emiliam.com)

पहिला टप्पा हा जीवन बदलणारा आहे. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला लाइफस्टाईलमध्ये बदल करावा लागेल. मनातल्या मनात लठ्ठपणा कमी करण्याचा संकल्प करा. मानसिक रूपाने जेवढे जास्त तुम्ही तयार व्हाल तेवढा जास्त फायदा तुम्हाला मिळेल. ही गोष्ट सहजतेने न घेता गंभीरतेने घ्या. जर तुम्ही पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मानसिक रूपाने तयार असाल तर पुढील टप्प्याकडे वळूया.

दुसरा टप्पा

(Image Credit : popsugar.com.au)

दुसरा टप्प्यात तुम्हाला तुमच्या विचाराची कृती करायची आहे. सर्वातआधी तर तुम्हाला तुमच्या डाएटवर लक्ष द्यावं लागेल. हाय फॅट, तळलेले-भाजलेले पदार्थ कमी खाणे. सकाळी नाश्ता वेळेवर करावा लागेल. रात्रीचं जेवण पौष्टिक आणि हलकं असावं. यासाठी तुम्ही तज्ज्ञांच्या मदतीने एक डाएट चार्ट तयार  करा. याच टप्प्यात तुम्हाला एक्सरसाइजचीही सुरूवात करायची आहे. सुरूवातीला हकल्या एक्सरसाइज करा. घाई करू नका, पण एक्सरसाइज नियमित करावी.

तिसरा टप्पा

तिसऱ्या टप्पा हा महत्वपूर्ण टप्पा आहे. त्यामुळे या टप्प्यातील गोष्टींचं पालन न चुकता करायला हवं. लाइफस्टाईल अॅक्टिव ठेवा. अजिबात आळशीपणा करू नका. सतत प्रत्येक ठिकाणी गाडीने जाऊ नका. पायी चालावे. लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. याने तुम्ही जास्तीत जास्त कॅलरी बर्न करू शकाल. हे तुम्हाला नियमित करायचं आहे.

चौथा टप्पा

(Image Credit : bestfood4u.wordpress.com)

तीन टप्प्यानंतर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये काही बदल करावे लागतील. डाएट टिप्समध्ये सर्वात महत्वपूर्ण बाब ही आहे की, तुम्हाला जेवण्याची पद्धत बदलावी लागेल. जेव्हाही जेवण कराल आरामात करा. अजिबात घाई-घाईने जेवण करू नका. खाण्यात केलेल्या घाईने पोटावरील चरबी अधिक वाढते. त्यामुळे आरामात जेवण करा आणि प्रत्येक घास चावून चावून खावा.

पाचवा टप्पा

हा टप्पाही वरील चार टप्प्यांप्रमाणे महत्त्वाचा आहे. यात तुम्हाला तुमच्या खाण्यातील कॅलरीवर लक्ष द्यावं लागेल. दिवसभरात तुम्ही किती कॅलरी खर्च करताय आणि किती आहारातून घेताय यावर लक्ष दिलं पाहिजे. जेवण कमी करण्यासाठी जेवण हळूहळू करा. हेल्दी डाएटसाठी हिरव्या भाज्या, फळं, दूध, दही, पनीर यांचा आहारात समावेश करा. जास्तीत जास्त पाणी प्यावे.


Web Title: How to lose weight and belly fat in 2 months?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.