जेवणाबाबत फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवाल तर डाएटची झंझट न ठेवता झटपट बारिक व्हाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 09:49 AM2020-03-02T09:49:34+5:302020-03-02T10:10:33+5:30
त्यावेळी व्यक्तीचे ‘बॉडी क्लॉक’ अशा पध्दतीने तयार होत असतं. जे वजन कमी होण्यासाठी फायदेशीर असतं.
(Image credit- tripsavy)
आपण कितीही जरी डाएट करायचं ठरवलं तरी घरात अनेकदा तेलकट, चमचमीत पदार्थ तयार केले जात असल्यामुळे आपण अशा पदार्थांचा समावेश आहारात करत असतो. पण खरंच तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर फक्त डाएट नाही काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रिसर्चवर आधारित असलेले वजन कमी करण्याचे नवीन उपाय सांगणार आहोत. जे तुम्हाला माहीतही नसतील. चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो रिसर्च.
या रिसर्चनुसार सकाळच्या नाष्त्यानंतर रात्रीपर्यंत सतत काहीनाकाही खात राहील्यामुळे वजन कमी करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. संध्याकाळच्या जेवणानंतर सकाळच्या नाष्त्यापर्यंत उपवास केल्याने वजन नियंत्रणात राहतं. हा रिसर्च पीएलओएस बायोलॉजी’ यात प्रकाशित झाला आहे. अमेरिकेच्या वेंडरबिल्ट यूनिवर्सिटीच्या रिसर्चकर्त्यांच्या मते वजन वाढून शरीरराचं असंतुल प्रामुख्याने व्यायामाचा अभाव असल्यामुळे होत असतं. रिसर्चकर्त्यांच्यामते दिवसाच्या ज्या वेळेत व्यक्ती अन्नाचं सेवन करत असतो. त्यावेळी व्यक्तीचे ‘बॉडी क्लॉक’ अशा पध्दतीने तयार होत असतं. जे वजन कमी होण्यासाठी फायदेशीर असतं.
जेवणाच्या योग्या वेळा म्हणजे सकाळी ९ ते १० आणि संध्याकाळी ७ ते ८. या वेळी जेवत असल्यामुळे पूर्वीच्या काळातील लोक निरोगी असायची . आजही जास्त श्रमाची कामे करणारी कामगार मंडळी याच वेळांमध्ये जेवण करतांना आढळतात. ज्यांना या वेळा पाळणे शक्य आहे, त्यांनी अवश्य या वेळांतच जेवण करावे. ( हे पण वाचा- हाडांमधून आवाज येत असेल तर 'या' गंभीर आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)
आपण ज्या अन्नाचे सेवन करतो. त्याचे नीट पचन करण्यासाठी शरिरात असलेल्या जठराग्नीवर असते. हा जठराग्नी, म्हणजेच आपल्या शरिरातील पचनशक्ती ही सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असते. रात्री झोपण्यापूर्वी पचन संपूर्ण झालेलं असतं. यासाठीही सूर्यास्तानंतर दीड दोन तांसाच्याआत जेवण पूर्ण झालेले असावे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात लवकर जेवण करणं शक्य नसेल तरी प्रयत्न करून तुम्ही जर लवकरात लवकर जेवाल तर नक्कीच फरक दिसून येईल.( हे पण वाचा-China Coronavirus : 'कोरोना'बाबतच्या 'या' गोष्टी पालकांना माहीत असायलाच हव्यात, अशी घ्या काळजी)