दररोज १० मिनिटे 'ही' एक्सरसाइज करुन वजन करा कमी, जाणून घ्या पद्धत! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 10:46 AM2019-04-08T10:46:14+5:302019-04-08T17:23:42+5:30

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे उपाय केले गेले तरच त्याचे फायदे अधिक बघायला मिळता.

How to lose weight fast in 7 days with help of jumping jack | दररोज १० मिनिटे 'ही' एक्सरसाइज करुन वजन करा कमी, जाणून घ्या पद्धत! 

दररोज १० मिनिटे 'ही' एक्सरसाइज करुन वजन करा कमी, जाणून घ्या पद्धत! 

googlenewsNext

(Image Credit : Healthline)

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे उपाय केले गेले तरच त्याचे फायदे अधिक बघायला मिळता. तसेच वजन कमी करण्यासाठी सुरू केलेली कोणतीही एक्सरसाइज किंवा डाएट मधेच सोडू नये. यात कार्डिओ वर्कआउटचं नाव सर्वातआधी येतं. वजन कमी करण्यासाठी हे प्रभावी एक्सरसाइज मानली जाते. ही एक्सरसाइज केवळ फॅट बर्न किंवा वेट लॉससाठी केली जात नाही तर या वर्कआउटने तुम्ही हेल्दीही राहता. तसेच हृदयही याने निरोगी राहतं. 

(Image Credit : Fat Clinics)

कार्डिओ वर्कआउट शरीरातील कॅलरी बर्न करण्यासाठी फार फायदेशीर आहे. कार्डिओमुळे हृदयासोबतच संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो. ज्यामुळे अर्थातच आरोग्य चांगलं राहतं. तज्ज्ञांनुसार, आठवड्यातून ५ दिवस रोज १५ ते २० मिनिटे तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज कराल तुम्ही याचा भरपूर फायदा मिळवू शकता. याने तुमचं वजनही कमी होईल आणि तुम्ही आतून-बाहेरून फिट रहाल.

जंपिंग जॅक हा वर्कआउट सर्वात सोपा मानला जातो. कारण हा वर्कआउट कुठेही केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला मशीनची गरज नाही आणि ना जिमला जाण्याची गरज आहे. हा वर्कआउट करण्यासाठी सरळ उभे रहा आणि जागेवर हात वरखाली करत उड्या मारा. ही एक्सरसाइज तुम्ही ३ ते ५ मिनिटे करा. नंतर याचा कालावधी एक-एक मिनिटाने वाढवा. रोज १० ते १५ मिनिटे हा वर्कआउट करा. जंपिंग जॅक ही एक एरोबिक कार्डिओ एक्सरसाइज असून याने वेगाने वजन कमी होतं. 

असे मानले जाते की, १० मिनिटे जंपिंग जॅक एक्सरसाइज केल्याने १०० कॅलरी बर्न होतात. त्यानुसार एका आठवड्यात तुम्ही ७०० कॅलरी बर्न करू शकता. याप्रकारच्या एक्सरसाइजमुळे तुम्ही वजनही कमी करू शकत आणि शरीरही फिट ठेवू शकता. तसेच ही गोष्टही लक्षात ठेवा की, एका ठरलेल्या कालावधी पेक्षा जास्त कोणतीही एक्सरसाइज करू नये. असं केल्याने फायदा कमी आणि नुकसान जास्त होतील. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यांनी सांगितल्यानुसार एक्सरसाइज करा. 

(टिप - या लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. याकडे तुम्ही प्रोफेशनल सल्ला या रूपाने बघू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारचं फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा डाएटमध्ये कोणत्याही प्रकारचं बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

Web Title: How to lose weight fast in 7 days with help of jumping jack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.