विना व्यायाम वजन कसे घटवाल? फॉलो करा या टिप्स, वजन होईल झटपट कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 05:27 PM2021-07-13T17:27:51+5:302021-07-13T17:28:25+5:30

तुम्हाला खरंच वजन कमी  करण्याची इच्छा असल्यास, काही गोष्टी काटेकोरपणे पाळणं अत्यंत आवश्यक आहे.अशावेळी शक्यतो व्यायामाचा सल्ला दिला जातो. पण व्यायाम न करताही वजन कमी करता येते. कसे? वाचा पुढे...

How to lose weight without exercise? Follow these tips, you will lose weight instantly | विना व्यायाम वजन कसे घटवाल? फॉलो करा या टिप्स, वजन होईल झटपट कमी

विना व्यायाम वजन कसे घटवाल? फॉलो करा या टिप्स, वजन होईल झटपट कमी

Next

तुम्हाला खरंच वजन कमी  करण्याची इच्छा असल्यास, काही गोष्टी काटेकोरपणे पाळणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा आपल्या जेवणाच्या वेळा सांभाळता येत नाहीत. त्यामुळे वजन वाढते. काही वेळा तणावामुळे वाढते. पण हे वजन वाढल्यानंतर अथवा शरीरात चरबी जमा झाल्यानंतर ती कमी करण्यासाठी मात्र दमछाक होते. अशावेळी शक्यतो व्यायामाचा सल्ला दिला जातो. पण व्यायाम न करताही वजन कमी करता येते. कसे? वाचा पुढे...

स्वत:चं जेवण स्वत: बनवा
स्वत:चं जेवण स्वत: बनवताना तुम्हाला स्वत:लाच लक्षात येत की तुम्ही जेवणात काय आणि कितीप्रमाणात टाकत आहात. यामुळे तुम्ही अनहेल्दी गोष्टी जेवणात कमी प्रमाणात वापरता. त्याचप्रमाणे स्वत:चं जेवण स्वत: बनवल्यामुळे तुम्हाला भूकही कमी लागते.

जास्तीत जास्त पाणी प्या 
दिवसातून जास्तीत जास्त पातळ पदार्थ अर्थात सूपसारख्या  पदार्थांचे सेवन करा. तसंच दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी तुमच्या पोटात जाणं आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळते. त्यामुळे शरीरातील चरबीही कमी होते. तसंच पाण्याचं प्रमाण योग्य असल्याने पचनक्रिया योग्य  होते हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

हळू आणि चावून खा
तुम्ही वजन त्वरीत कमी करायचं असेल तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. कोणताही पदार्थ खाताना तुम्ही तो हळू आणि चावूनच खायला हवा. अन्यथा पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. त्यामुळे वजन अधिक वाढतं. पचनक्रिया व्यवस्थित असेल तर वजन कमी करणं सोपं होतं.

अनहेल्दी खाण्याचा स्टॉक ठेवू नका
लठ्ठपणा वाढेल अशा अनहेल्दी खाण्याचा अर्थात वेफर्स, तेलकट पदार्थांचा कोणताही स्टॉक या दहा दिवसात घरात ठेवू नका. घरात अशा वस्तूंचा स्टॉक असला तरीही मनावर नियंत्रण ठेवून तुम्ही या पदार्थांपासून लांबच राहण्याचा  प्रयत्न करा. तरच तुम्हाला यश मिळू शकेल.

स्नॅक्स खाणं कमी करा
जास्त लोक ऑनलाईन शॉपिंग करताना किंवा वेबसिरिज बघताना स्नॅक्स खातात. हे टाळा. तुम्हाला अशी सवय असल्यास ती आजच बदला. तुम्ही ड्रायफ्रुट्स, नट्स, मखाना यांच सेवन करू शकता.

Web Title: How to lose weight without exercise? Follow these tips, you will lose weight instantly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.