ब्रा फॅटमुळे जास्त बेढब दिसत असाल तर 'या' उपायांनी चरबी करा कमी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 10:54 AM2020-03-04T10:54:15+5:302020-03-04T11:08:05+5:30

हातांच्या दंडाच्या खालच्या भागाचं फॅट वाढलं असेल तर कोणताही आऊटफिट असो कुर्ती किंवा टीशर्ट घातल्यानंतर  हात खूपचं खराब दिसत असतात.

How to loss bra fat in a easiest way | ब्रा फॅटमुळे जास्त बेढब दिसत असाल तर 'या' उपायांनी चरबी करा कमी...

ब्रा फॅटमुळे जास्त बेढब दिसत असाल तर 'या' उपायांनी चरबी करा कमी...

googlenewsNext

तुमची शरीरयष्टी कशीही असो ब्रा फॅट कोणालाही येऊ शकतं. ब्रा ब्लज फॅटमुळे  फक्त  जाडंच नाही तर बारिक महिली सुद्धा  हैराण असतात. त्यामुळेच व्यायाम करण्याची पध्दत चुकीची होऊ शकते.  हातांच्या दंडाच्या खालच्या भागाचं फॅट वाढलं असेल तर कोणताही आऊटफिट असो कुर्ती किंवा टीशर्ट घातल्यानंतर  हात खूपचं खराब दिसत असतात. तुम्ही सुद्धा अशा शरीरयष्टीमुळे हैराण झाला असाल तर आज आम्ही तुम्हाला काही खास व्यायाम प्रकार सांगणार आहोत. ज्यांच्या सहाय्याने तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासह ब्रा फॅट सुद्धा कमी करू शकता. 

पुशअप

पुशअप करून तुमचं शरीर चांगलं राहील. इतकंच नाही तर तुम्हाला ब्रा फॅट्सपासून सुद्धा आराम मिळेल. पुशअप्समुळे आपल्या हाताचे ट्रायसेप्स, बायसेप्स आणि त्याचबरोबर चेस्ट मसल्सचा टोनही सुधारेल. अनेकांना, विशेषत: महिलांना आपल्या पोटाची खूपच काळजी असते. त्यामुळे पुशअप्स झाल्यानंतर थोडा अ‍ॅबडॉमिनल म्हणजे पोटाचा एक्सरसाइज करावा. चेस्ट मसल्स टार्गेट करण्यासाठी आपल्याला जमतील तेवढे डिप्स मारावेत. आपल्या शरीराच्या खालच्या भागाकडे, पायांकडेही तितकंच लक्ष द्यायला हवं. मांड्यांसाठी लंजेस आणि पोटºयांसाठी, भिंतीचा वगैरे आधार घेऊन पायाच्या बोटांवर उभं राहून पोटरीवर ताण द्यावा.

दोरी उड्या

घरच्याघरी सुद्धा दोरी उड्या मारून तुम्ही ब्रा फॅटपासून सुटका मिळवू शकता. यासाठी एका मोकळ्या जागी २ ते ५ मिनिटांपर्यंत  व्यामाम करा. त्यानंतर दहा ते पंधरा वेळा हा व्यायाम प्रकार रिपिट करा. फक्त ब्रा फॅट नाही तर इतर अवयवांवर देखील परिणाम दिसून येईल.

माउंटेन क्लॅंबर

माऊंटन क्लॅबर  करण्यासाठी सगळ्यात आधी शरीराला टोन करण्याची जास्त गरज आहे. यासाठी पोटावर झोपून शरीराला वर उचला आणि  पाय  पोटाजवळ आणून परत मागे न्या. असं दोन्ही पायांनी करा. ( हे पण वाचा- Corona virus : कोरोना व्हायरस सगळीकडे कसा पसरतो? जाणून घ्या A to Z कारणं)

ओवर हेड पुल

अतिशय  सोपा असा हा व्यायाम प्रकार आहे.  त्यासाठी तुम्हाला फक्त  दोन्ही हातात डमबेल्स पकडून उभं राहायचं आहे.  हात सरळ कोपरांमध्ये वाकवू वर न्यायचा आहे. नंतर  खांद्यापर्यंत घ्यायचा आहे. तुम्हाला जमेल तसं 10 ते 20 वेळा हा व्यामाम प्रकार करा.  (  हे पण वाचा-Cross Leg करून बसणं पडू शकतं महागात, कसं ते वाचाल तर कधीच तसं बसणार नाही!)

Web Title: How to loss bra fat in a easiest way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.