वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात 'हे' हार्मोन्स ......जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 05:27 PM2019-12-07T17:27:31+5:302019-12-07T17:32:09+5:30
आपल्या शरीरात काही हार्मोन्स असे असतात. जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
आपल्या शरीरात काही हार्मोन्स असे असतात. जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. व्यायाम केल्यानंतरही वजन कमी होत नसेल, तर तुम्ही या हार्मोन्सना सक्रिय करून चरबी घटवू शकता. वजन कमी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा तुम्ही डाएटमध्ये कमी कॅलरी घेता आणि एक्सरसाइज वाढवता, तेव्हा शरीरातील पेशींमध्ये फॅटने शरीराला ऊर्जा मिळते.
तसेच बरेच लोक दैनंदिन जीवन जगत असताना शरीराची फारशी हालचाल करत नाहीत. त्यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. त्यामुळे लठ्ठपणा येतो. तसेच विविध आजारांचा सामना करावा लागतो. शरीरातील वाढलेली चरबी ही कधीच रातोरात कमी होत नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असलेल्या ह्या हार्मोन्सविषय़ी .
लेप्टीन या हार्मोनमुळे भूकेवर नियंत्रण मिळवता येते. आपलं पोट भरलं असल्याची जाणीव ह्या हार्मोनची पातळी वाढल्यामुळे होते. आणि या हार्मोनची शरीरातील पातळी वाढवण्यासाठी रोज नियमीत ७ ते ८ तास झोप घेणं आवश्यक आहे.
थाइरॉईडपासुन निर्माण होणारे हार्मोन टी३ आणी टी४ हार्मोन कॅलरी बर्न करण्याची क्षमता वाढवतात. या हार्मोनची पातळी वाढवण्यासाठी आयोडीन तसेच मीठाचे पदार्थ खावेत. तसेच काहीवेळा वजन वाढू देखील शकतं. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
टेस्टोस्टेरोन हा हार्मोन पुरूषांमध्ये मसल्सची वाढ करतो. आणि टेस्टोस्टेरोन शरीरातील चरबी घटवण्यासाठी फायदेशीर ठरतो. या हार्मोनची पातळी वाढवण्यासाठी जास्त व्यायाम करणं गरजेचं आहे.