वर्षाच्या सुरूवातीलाच 'या' गोष्टी फॉलो कराल तर वजन नक्की होईल कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 03:55 PM2019-12-26T15:55:16+5:302019-12-26T16:00:22+5:30
आपण दैनंदिन जीवन जगत असताना आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करत असतो.
आपण दैनंदिन जीवन जगत असताना आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करत असतो. तसंच काय खायचं किंवा काय नाही खायचं याबद्दल आपल्याला काही कल्पना नसेल तर आहारात ताळमेळ राहत नाही. खाण्यापिण्यात नियमीतता आणि बाहेरचं खाणं यांमुळे वजन वाढण्याची समस्या जास्त जाणवते तसंच आहारात मीठांच प्रमाण सर्वाधीक असल्यामुळे वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया वाढलेलं वजन तुम्ही नवीन वर्षात कसं कमी कराल.
तिखट खा
जर तुम्हाला वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर जास्तीत जास्त तिखट खाण्याचा प्रयत्न करा. तिखट खाल्ल्यामुळे मॅटाबोलीजम वाढतं असंत. त्यासाठी आहारात काळी मिरी तसेच मिरची असलेल्या पदार्थांचं सेवन करा. काळ्या मिरित कॅप्सीक अमाईन असते त्यामुळे मेटाबॉलीझम व्यवस्थित राहतं.
व्यायामाआधी कॉफी
कॉफीमध्ये असणारे कॅफिन तुमच्या शरीराला उत्तेजन देत असतात. त्यात नॉरेपिनेफ्रिन आणि डोपामाइन यांचा समावेश असतो. हे घटक शरीरातील उर्जा वाढवण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. तसंच मेटाबॉलिक रेट वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. जर तुम्ही जीमला जाण्याआधी किंवा व्यायाम करण्याआधी कॉफीचे सेवन केले तर फायदेशीर ठरतं असतं.
व्यायाम
जर तुम्ही जास्तवेळ बसून राहण्याचा जॉब करत असाल तर तुम्ही दररोज व्यायम करण गरचेचं आहे. तसंच फिजिकली एक्टीव्ह असणं सुद्दा गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे शरीर आणि हार्टरेट व्यवस्थित राहतात तसंच वेगवेगळ्या जीवनशैलीशी निगडीत आजारांपासून बचाव होतो. त्यासाठी जीमला जाणं शक्य नसल्यास घरच्या घरी तरी १ तास व्यायाम करा.
वेळेवर झोप घ्या
जर तुम्हाला झोपायला पुरेसा वेळ मिळत नसेल किंवा झोप पूर्ण होत नसेल तर मेटाबॉलीझम हे संथगतीने काम करतं. त्यामुळे शरीराचे कार्य व्यवस्थीत चालण्यासाठी ७ ते ८ तास झोप घेणं फायद्याचं ठरतं. तसंच सकाळचा नाष्ता हा आपल्या आहारात महत्त्वाचा असतो. कारण जेव्हा आपाण सकाळी पोषक आणि पोटभर नाष्ता करत असतो. त्यावेळी शरीरात मेटाबलीजम व्यवस्थीत काम करतं असतं. तसंत फॅट्स बर्न होण्यास पण मदत होत असते. हेल्दी राहण्यासाठी सगळ्यात महत्वाच असतं ते म्हणजे जास्त पाणी पिणे, दिवसातून कीमान २ ते ३ लीटर पाणी प्यायल्याने अपचनस गॅस यांसारख्या पोटाच्या समस्या उद्भवत नाही.