वजन वाढलयं? हळदीच्या वापराने ७ दिवसात वजन होईल कमी, मग बघा कमाल....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 12:47 PM2019-12-02T12:47:46+5:302019-12-02T12:56:21+5:30
हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधी गुणधर्मामुळे प्रचलीत आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचा गुण हळदीत आहे.
हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधी गुणधर्मामुळे प्रचलीत आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचा गुण हळदीत आहे. हळद या पदार्थांत आरोग्यासाठी पोषक असणारे बरेच गुण आहेत. त्यामुळे पुर्वापार पासून घराघरात हळदीचा वापर केला जातो. हळद पोटाचे विकार तसेच रक्तशुध्द करण्यास गुणकारी आहे. पित्ताचा त्रास असल्यास हळदीमुळे कमी होतो. यांमुळे रंग उजळतो. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी सुध्दा हळद फायदेशीर ठरते. चला मग जाणून घ्या हळदीचे सेवन कशाप्रकारे केल्याने वजन कमी होईल.
सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी काही लोकं पितात. कारण सकाळी गरम पाणी प्यायल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून सेवन केले तर याचे फायदे अधिक वाढतात. हळदीमधील आरोग्यासाठी फायदेशीर तत्वं शरीराला मिळतात. जर तुम्ही दररोज सकाळी या पाण्याचे सेवन कराल तर शरीरातील फॅट्स कमी होतील. आणि लिव्हर साफ राहिल. हळदीमध्ये असणारे गुण हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी लाभदायक ठरतात.
हळदीमुळे त्वचेमधील विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते. त्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. तसेच पिठामध्ये थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग तसेच अंगाला येणारी खाज थांबते. हळदीमध्ये काही अॅन्टी ऑक्सीडेंट्स असतात. जे शरीरातील पोटावरील आणि चरबी आणि फॅट्स कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. तसेच गॅस, अपचन यांसारखे पोटाचे विकार दूर करण्यासाठी हळदीचा उपयोग केला जातो. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका टळतो.