हिवाळ्यात व्यायाम करून नाही तर 'हे' पदार्थ खाऊन वजन करा कमी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 02:14 PM2020-01-05T14:14:08+5:302020-01-05T14:17:16+5:30

शरीर व्यवस्थित राहण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं असतं

How to loss weight in winter by using sprouts | हिवाळ्यात व्यायाम करून नाही तर 'हे' पदार्थ खाऊन वजन करा कमी...

हिवाळ्यात व्यायाम करून नाही तर 'हे' पदार्थ खाऊन वजन करा कमी...

googlenewsNext

शरीर व्यवस्थित राहण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं असतं. दैनंदिन जीवन जगत असताना नेहमीच ऑफिसच्या वेळेमुळे आणि  घरच्या कामांमुळे व्यायाम करायला मिळत नाही. तसंच  खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पोषक घटकांचा अभाव यांमुळे आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. यात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वजन वाढण्याची कारण सतत ऑफिसमध्ये बसून राहिल्यामुळे वाढलेलं वजन कमी करणं आवाहानात्मक ठरतं. 

तुम्ही सुद्धा याच समस्येला सामोरे जात असाल आणि व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर काळजी करण्याचे काहीही कारण नाही. काही पदार्थांचा समावेश  आहारात करून तुम्ही या समस्येला टाळू शकता. तसंच या पदार्थाच्या सेवनाने तुम्हाला भरपूर फायदे मिळतील. रोजच्या जेवणात आपण वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करत असतो आणि कधीतरी आपण कडधान्यांचा समावेश रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात करत असतो.  पण तुम्हाला कडधान्यांचे वजन कमी करण्याच्या दृष्टीने फायदे कळतील तर तुम्ही दररोज कडधान्यांचा समावेश आहारात कराल. चला तर मग जाणून घेऊया कडधान्यांच्या सेवनाचे फायदे काय आहेत.

कडधान्यांतील प्रथिनं पचायला सोपी असतात. कडधान्य मोड आणून खाल्लीत तर अधिक फायदेशीर ठरेल मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये कडधान्य हलके होतात आणि पचायला सुलभ होतात. मोड आलेली कडधान्य सुकवून ठेवता येतात. अशा सुकविलेल्या मोडामध्ये कर्बोदकांचे आणि क जीवनसत्वांचे प्रमाण अधिक असते. 

शरीरातील विषारी घटक बाहेर  काढण्यासाठी कडधान्य फायदेशीर ठरतात. त्यामुळे शरिराला उर्जा मिळते. आणि न्यूट्रिशियन्स सुद्धा मिळतात. मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने  गॅस एसिडिटीची समस्या दूर होते.कडधान्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असतं आणि प्रोटिन्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वजन वाढत नाही तसंच पोषक घटक मिळतात. तसंच कडधान्यांच सेवन करणं  हे गरोदर महिलेसाठी सुद्धा उपयूक्त असतं.

तसंच जर तुम्ही वजन कमी करण्यासोबतच कडधान्यांच्या सेवनाने अनेक फायदे मिळवू शकता. वाढत्या वयात तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी  कडधान्यांचा आहार लाभदायक ठरतो.  कडधान्यांच सेवन केल्यास  कॉलेस्ट्रॉलची लेव्हल नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदयाशी संबंधीत आजार होण्यापासून वाचता येऊ शकतं. डोळ्यांसाठी सुद्धा मोड आलेली कडधान्य उपयुक्त ठरतात. 

मूग, मटकी, चवळी, यांसह अनेक कडधान्यांचे प्रकार उकडून खाल्यास त्याचा पुरेपूर शरीराला फायदा मिळतो. तसंच जर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुमची उर्जा अधिक वाढवण्यासाठी  कडधान्यांच सेवन फायदेशीर ठरतं. 

Web Title: How to loss weight in winter by using sprouts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.