घरच्या घरी बनवा 'या' पदार्थांपासून माऊथ फ्रेशनर, तोंडाची दुर्गंधी पळवण्याचा खास पर्याय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 02:57 PM2018-10-05T14:57:34+5:302018-10-05T14:57:58+5:30
अनेकांना तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या असते. यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या औषधांचा किंवा टूथपेस्टचा वापर करतात.
अनेकांना तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या असते. यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या औषधांचा किंवा टूथपेस्टचा वापर करतात. काही लोक घरगुती उपायांची मदत घेतात. पण त्यानेही फायदा होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रोजच्या वापरातील वस्तूंपासून तयार करण्यात माऊथ वॉथ तयार करण्याची रेसिपी सांगणार आहोत. यांच्या मदतीने तुम्ही प्रभावी माऊथ वॉश तयार करु शकता.
१) ओवा आणि पुदीना माऊथ वॉश
हे माऊथ वॉश तयार करण्यासाठी दोन चमचे ओवा, दोन चमचे पुदीना एक कप पाण्यात टाकून चांगलं मिश्रित करा. त्यानंतर हे मिश्रण एका भांड्यात काढा. रोज ब्रश केल्यानंतर या माऊथ वॉशने गुरळा करा. याने तुमच्या तोंडाची दुर्गंधीच जाईल आणि तुम्हाला फ्रेशही वाटेल.
२) लवंग आणि दालचीनी माऊथ वॉश
हे अनेक दिवस स्टोर केलं जाऊ शकणारं माऊथ वॉश आहे. हे तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या, त्यात दालचीनीच्या तेलाचे १० ते १५ थेंब आणि लवंग तेलाचे १० ते १५ थेंब मिश्रित करा. तयार आहे तुमचं होममेड माऊथ वॉश. याने तुमच्या तोंडाची दुर्गंधीही जाईल आणि दातांना किडही लागणार नाही.
३) पेपरमिंट माऊथवॉश
हे माऊथ वॉश तयार करण्यासाठी एक कप पाणी आणि बेकिंग सोडा घ्या. ८ ते ९ पुदीन्याची पाने आणि टी ट्री ऑईलचे दोन थेंब टाकून मिश्रण तयार करा. तयार आहे तुमचं पेपरमिंट माऊथ वॉश. आता हे चाळनीने गाळून घ्या. दिवसातून एकदा याचा नक्की वापर करा.