वजन कमी करण्यासाठी अशी तयार करा पालकची भाजी; होतील फायदेच फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 11:56 AM2019-10-06T11:56:18+5:302019-10-06T11:57:02+5:30
वजन कमी करण्यासाठी अनेक डाएट प्लान करून कंटाळला असाल तर तुम्ही एकाद तरी पालक डाएट ड्राय करून पाहा. पालकची भाजी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु वजन कमी करण्यासाठी पालक डाएट अत्यंत फायदेशीर ठरतं.
वजन कमी करण्यासाठी अनेक डाएट प्लान करून कंटाळला असाल तर तुम्ही एकाद तरी पालक डाएट ड्राय करून पाहा. पालकची भाजी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु वजन कमी करण्यासाठी पालक डाएट अत्यंत फायदेशीर ठरतं. जर फिटनेस एक्सपर्ट आणि डाएट एक्सपर्ट्सबाबत बोलायचे झाले तर त्यांच्यानुसार, वजन कमी करण्यासाठी डाएट प्लानसोबत एक्सरसाइज करणंही आवश्यक आहे. हेल्दी लाइफ स्टाइल, हेल्दी डाएट आणि हेल्दी पदार्थ एकत्र करून वजन कमी केलं जाऊ शकतं.
पालकची भाजी अनेकांची नावडती भाजी असते. पालकच्या भाजीचा आहारात समावेश करण्यासाठी एखाद्या पदार्थासोबत एकत्र करावं लागतं. आता तुम्ही विचार करत असाल की, वजन कमी करण्यासाठी पालकच्या भाजीचा आहारात कसा समावेश करावा? जाणून घेऊया त्याबाबत...
वजन कमी करण्यासाठी पालकची भाजी कशी खावी?
जेव्हाही वेट लॉस डाएट प्लान तयार करण्यात येतो, त्यावेळी हेल्दी पदार्थांचीच चर्चा होते. अशातच पालकचा समावेश तुम्ही तुमच्या वेट लॉस डाएट प्लानमध्ये करू शकता. त्यासाठी तुम्ही पालकचा दोन पद्धतींनी करू शकता.
लठ्ठपणा घटवण्यासाठी पालक जर कच्च्या स्वरूपात खाण्यात आलं तर सर्वात उत्तम ठरतं. जर तुम्ही पालक कच्चं खाऊ शकत नसाल तर पालक स्मूदी तयार करू शकता. स्मूदीसाठी पालकसोबत एखादं फळंही एकत्र करू शकता. जर वजन घटवण्यासाठी पालक ज्यूसही पिऊ शकता. पालक ज्यूसमध्ये लिंबू, पुदिना यांसारखे पदार्थ एकत्र करू शकता.
वजन कमी करण्यासाठी कोणत्या पद्धतीने कराल पालकची भाजी?
लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये पालकच्या भाजीचा नक्की समावेश करा. जर तुम्हाला पालकच्या भाजीची चव आवडत नसेल तर तुम्ही त्यासोबत इतर पदार्थ एकत्र करून खाऊ शकता.
पालकची भाजी तुम्ही पनीर किंवा चण्यांसोबत एकत्र करून खाऊ शकता. पालक पनीर ही एक हेल्दी डाएट रेसिपी असून वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. अशाचप्रकारे तुम्ही पालक चणा अशी भाजीही तयार करू शकता.
पालकमध्ये पनीर किंवा चणे तयार करून खाल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. या दोन्ही भाज्या नाश्ता किंवा दुपारच्या जेवणासाठी फायदेशीर ठरतात. पालकची भाजी अशा पद्धतीने खाल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होईल.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं.)