एका दिवसात किती चपात्या खाव्यात? जाणून घ्या किती असावं तुमचं प्रमाण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 11:26 AM2024-10-09T11:26:13+5:302024-10-09T11:38:36+5:30
How Many Roti Should Eat In A Day: एका व्यक्तीने सामान्यपणे एका दिवसात किती चपात्या खाव्यात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल, त्याचंच उत्तर आज जाणून घेणार आहोत.
How Many Roti Should Eat In A Day: जगभरातील लोक आपल्या दोन वेळच्या जेवणासाठी धावपळ करत असतात. त्यासाठी ते कोणतंही काम किंवा मेहनत करण्यासाठी तयार असतात. भातासोबतच चपाती हा भारतीय आहारातील महत्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या भारतात मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रोज खाल्ल्या जाणाऱ्या सामान्य चपातीबाबत. एका व्यक्तीने सामान्यपणे एका दिवसात किती चपात्या खाव्यात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल, त्याचंच उत्तर आज जाणून घेणार आहोत.
कसं ठरवाल चपातीचं प्रमाण?
एका व्यक्तीने एका दिवसात किती चपात्या खाव्यात हे वेगवेगळ्या गोष्टींवरून ठरतं. जसे की, उत्पन्न, तुमचं वय, तुमची लाइफस्टाईल आणि फिजिकल अॅक्टिविटी. एका संतुलित आहारात आणि निरोगी जीवनासाठी हे ठरवणं महत्वाचं असतं की, तुम्ही दिवसातून किती चपात्या खाव्यात.
एका दिवसात किती चपात्या खाव्या?
न्यूट्रिशनिस्ट निखिल वत्स यांच्यानुसार, एक निरोगी व्यक्ती रोज कमीत कमी ५ ते ७ चपात्या खाऊ शकते. मात्र, प्रत्येक व्यक्तीची गरज वेगवेगळी असते. त्यामुळे चपात्यांचं प्रमाण ठरवण्याआधी डॉक्टर किंवा डायटिशिअनचा सल्ला घ्यावा.
कसं ठरवाल चपात्यांचं प्रमाण?
उत्पन्न
तुमच्या उत्पन्नानुसार तुमचं चपाती खाण्याचं प्रमाण ठरवलं जाऊ शकतं. जर तुमचं उत्पन्न चांगलं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात मल्टीग्रेन पीठाच्या चपात्या खाऊ शकता. ज्या जास्त हेल्दी असतात.
फिजिकल अॅक्टिविटी
तुमच्या दिवसभराच्या हालचालीच्या आधारावर तुम्ही चपात्यांचं प्रमाण ठरवू शकता. जास्त फिजिकल अॅक्टिविटी करणाऱ्या लोकांना अधिक पोषणाची गरज असते.
संतुलित आहार
चपात्यांसोबतच तुम्हाला संतुलित आहारही महत्वाचा असतो. तुमच्या रोजच्या आहारात डाळी, भाज्या, प्रोटीन आणि फळांचा समावेश असावा.
आजार
असे अनेक आजार असतात ज्यात कमी तुम्हाला एक्सपर्ट कमी चपात्या खाण्याचा सल्ला देत असतात. कारण असं केलं नाही तर तुम्हाला पचनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.