वजन कमी करत असाल तर रोज किती चपात्या खाव्यात? जाणून उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 11:59 AM2024-08-07T11:59:20+5:302024-08-07T12:00:12+5:30
Weight Loss tips : भारतीय आहारात चपाती आणि भात जास्त खाल्ला जातो. ज्यात कार्ब भरपूर असतात. वजन कमी करणारे लोक चपाती खाण्याबाबत फार काळजी घेतात.
Weight Loss tips : तुमचं जर वजन वाढलेलं असेल आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नात तुम्ही असाल तर आहारात काय असावं आणि काय नसावं हे फार महत्वाचं ठरतं. सामान्यपणे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणारे लोक कार्बचं सेवन कमी करतात. कारण कार्ब वजन वाढण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. मात्र, सोबतच हे एक महत्वाचं मायक्रोन्यूट्रिएंटही आहे. अशात याला आहारातून पूर्णपणे दूर करणंही चुकीचं ठरेल.
भारतीय आहारात चपाती आणि भात जास्त खाल्ला जातो. ज्यात कार्ब भरपूर असतात. वजन कमी करणारे लोक चपाती खाण्याबाबत फार काळजी घेतात. अशात अनेकांना प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी दिवसातून किती चपात्या खाव्यात? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
कार्ब्स, प्रोटीन आणि फॅटला मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणून ओळखलं जातं. शरीरातील वेगवेगळ्या क्रिया पूर्ण करण्यासाठी याची खूप गरज असते. सामान्यपणे एका छोट्या चपातीमध्ये जवळपास ७१ कॅलरी असतात. जर तुमच्या दुपारच्या जेवणात कॅलरीचं सेवन ३०० असेल तर तुम्ही दोन चपात्या खाऊ शकता. ज्यात १४० कॅलरी असतात. बाकी कॅलरी तुम्हाला भाजी किंवा सलादमधून मिळतात. केवळ चपाती किंवा भातच नाही तर तुम्ही खात असलेल्या भाज्या आणि फळांमध्येही कार्ब्स असतात.
एका दिवसात किती चपात्या खाव्यात?
तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही एका दिवसात किती चपात्या खाव्यात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे मुळात तुमच्या कॅलरी सेवनावर अवलंबून असतं. तसे वजन कमी करण्यासाठी तुम्ही एका दिवसात चार चपात्याचं सेवन करू शकता.
वजन कशाने कमी होईल?
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही ज्वारी किंवा बाजरीची भाकरी खाऊ शकता. या भाकरी गव्हाच्या चपात्यांपेक्षा हेल्दी असतात. यात जास्त पोषक तत्व आणि कार्बोहायड्रेट कमी असतात.