न झोपता किती दिवस जिवंत राहू शकतात मनुष्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 01:15 PM2023-12-15T13:15:36+5:302023-12-15T13:16:03+5:30
पुरेशी झोप न घेतल्याने आपल्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. याच कारणाने खाण्यासोबत झोपेलाही आरोग्यासाठी फार महत्वाचं मानलं आहे.
How Many Days Human Survive Without Sleep: झोप आपल्या आरोग्यासाठी फार गरजेची असते. सगळ्यांनाच रोज 7 ते 8 तास झोपण्याचा सल्ला दिला जातो. असं केलं नाही तर आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपलं शरीर आणि मेंदू रिकव्हरी मोडमध्ये असतो. यात आपल्याला दुसऱ्या दिवसासाठी नवीन एनर्जी मिळते आणि मानसिक कामकाजही व्यवस्थित होतं. पुरेशी झोप न घेतल्याने आपल्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. याच कारणाने खाण्यासोबत झोपेलाही आरोग्यासाठी फार महत्वाचं मानलं आहे.
अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न पडत असेलच की, जर एखादी व्यक्ती 10 दिवस किंवा 20 दिवस झोपली नाही तर काय होईल? असं केल्याने मृत्यू होतो का? हेल्थलाईन रिपोर्टमध्ये एक्सपर्ट्सच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, एक दिवसही झोपले नाही तर आरोग्यावर खूप प्रभाव पडतो. अशात जर एखादी व्यक्ती एक आठवडाभर झोपली नाही तर त्याची तब्येत खूप बिगडू शकते. जास्त काळ कमी झोप घेतल्याने विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता कमी होते. तसेच शरीराचं आणि मेंदुचं कामही बिघडतं. शरीराच्या सगळ्या अवयवांवर याचा प्रभाव पडतो.
कमी झोप घेतल्याने मृत्यू होता का?
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, झोपेचा थेट संबंध हृदय, मेंदू आणि ब्लड प्रेशरसहीत वेगवेगळ्या अवयवांसोबत असतो. कमी झोप घेतल्याने हार्ट डिजीज, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा यांच्यासहीत अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. अशात जर एखादी व्यक्ती जास्त काळ झोपली नसेल तर यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. पण हे सांगणं अवघड आहे की, किती दिवस न झोपल्याने व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. याबाबत वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. पण याबाबत अजून ठोस असं समोर आलं नाही.
न झोपता किती दिवस जिवंत राहतो मनुष्य?
साइंटिफिक अमेरिकनच्या एका रिपोर्टनुसार, 1965 मध्ये एक 17 वर्षीय विद्यार्थी रॅंडी गार्डनरने एक सायन्स फेअरमध्ये न झोपता 264 तास म्हणजे साधारण 11 दिवस लगोपाठ न झोपण्याचा वर्ल्ड रिकॉर्ड बनवला होता. इतर काही रिसर्चमध्ये लोकांचे लागोपाठ 8 ते 10 दिवस जागण्याचे परिणामही समोर आले. अमेरिकेच्या शिकागो यूनिवर्सिटीच्या अभ्यासकांनी याबाबत उंदरांवर एक प्रयोग केला होता. यातून समोर आलं होतं की, 2 आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त झोप न घेतल्याने उंदीर मरण पावले.