किती दिवस झालेत पायी चालून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 07:17 PM2017-10-27T19:17:25+5:302017-10-27T19:18:57+5:30
व्यायाम म्हणून तुम्ही चालत असालही, पण छोट्यामोठ्या कामांसाठीही पायीच फिरुन बघा तर खरी..
- मयूर पठाडे
बघा आठवून.. पायी चालून किती दिवस झालेत?.. म्हणजे घरातल्या घरात किंवा आॅफिसमध्ये जे काही चालावं लागत असेल ते नाही. काही जण विशेषत: कारखान्यांमध्ये काम करणारे वर्कर्स, कर्मचारी बरेच तास उभे असतात. उभं राहाण्याचा त्यांचा जॉबच असतो. काही कर्मचाºयांना आॅफिसातल्या आॅफिसातही बराच काळ चालावं लागतं.. अनेकांना वाटतं, त्यातच आमचा खूप व्यायाम होतो, पण वैद्यकीय परिभाषेत याला व्यायाम म्हणत नाहीत. उलट ज्या वेळेस तुम्ही एकच एक काम सातत्यानं करता, त्यावेळी तुमच्या शरीराच्या त्या विशिष्ट भागावरच जास्त ताण येतो, त्यावर अनावश्यक जबाबदारी पडते आणि त्याची जास्त झीजही होते..
काही जण व्ययामानिमित्त सकाळी फिरायला जात असतील, काही जण रनिंग, जॉगिंग करत असतील, तो अपवाद, पण खरंच सांगा, गेल्या किती दिवसांत तुम्ही जवळच्याच कोपºयावर असलेल्या भाजीबाजारात किंवा टपरीवर पायी चालत भाजी आणलीत? किती वेळा पायी किराणा दुकानातून वस्तू घेऊन आलात? मुलांसाठी काही वह्या, पुस्तकं, पेन किंवा इतर गोष्टी आणण्यासाठी गल्लीतल्याच स्टेशनरी दुकानात पायीच गेलात?..
बहुतांश याचं उत्तर नकारात्मकच येईल. या सगळ्या गोष्टी आपण बºयाचदा करतोही, पण कसं? आॅफिसातून येताना, कामात काम म्हणून किंवा फक्त त्याच कामासाठी गेलो तरी गाडीवरच जातो.
अभ्यासकांचं म्हणणं आहे, रोज किमान काही वेळ तरी आपण पायी चाललं पाहिजे. त्यातून अनेक गोष्टी साध्य होतात. मुख्य म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी चालणं अत्यंत उपयोगी आहे. व्यायाम म्हणून तुम्ही चालता, त्यापेक्षाही रोजच्या अशा साध्या साध्या गोष्टी जर तुम्ही पायीच जाऊन करीत असाल, तर त्याचा जास्त उपयोग होतो हे आता सिद्ध झालेलं आहे.
मुख्य म्हणजे यामुळे तुमचा ताणतणाव किमान निम्म्यानं कमी होतो. तुमचा संवाद वाढतो. हृदयाची शक्ती वाढते. उत्साह वाढतो. नवी आव्हानं घेण्यासाठी तुम्ही सज्ज होता..
असं बरंच काही..
मग पायी चालणार ना आता आजपासून?
व्यायाम म्हणून तुम्ही चालत असलात, तरी जवळपासची छोटीमोठी कामंही जरा पायी फिरुनच करा. बघा.. तुम्हाला नक्कीच फ्रेश झाल्यासारखं वाटेल. नव्हे, तुम्ही व्हालच फ्रेश..
अभ्यासकांचं म्हणणं आहे, रोज किमान काही वेळ तरी आपण पायी चाललं पाहिजे.
व्यायाम म्हणून तुम्ही चालता, त्यापेक्षाही रोजच्या साध्या साध्या गोष्टी जर तुम्ही पायीच जाऊन करीत असाल, तर त्याचा जास्त उपयोग होतो.
पायी चालण्यानं ताणतणाव कमी होतो. तुमचा संवाद वाढतो. हृदयाची शक्ती वाढते. उत्साह वाढतो.