त्वचेसंबंधी अनेक समस्या टाळण्यासाठी किती दिवसांनी धुवावा टॉवेल? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 03:49 PM2024-11-20T15:49:19+5:302024-11-20T15:59:38+5:30
घाणेरड्या टॉवेलमुळे स्कीन इन्फेक्शन, पिंपल्स, रॅशेज आणि इतकंच नाही तर फंगल इन्फेक्शनसारख्या समस्यांचा धोका असतो.
How you should wash your towel properly: टॉवेल रोज वापरली जाणारी एक महत्वाची वस्तू आहे. हात पुसायला, शरीर पुसायला सतत अनेकदा टॉवेलचा वापर केला जातो. मात्र, एकाच घरातील बरेच लोक एकच टॉवेल वापरतात जे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. असं केल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो. तसेच जर टॉवेलचा वापर जास्त दिवस न धुताच केला तर त्यात बॅक्टेरिया आणि फंगस लागण्याचा धोकाही असतो. घाणेरड्या टॉवेलमुळे स्कीन इन्फेक्शन, पिंपल्स, रॅशेज आणि इतकंच नाही तर फंगल इन्फेक्शनसारख्या समस्यांचा धोका असतो.
बॅक्टेरिया आणि फंगसचा धोका
ओलावा शोषूण घेण्याचा गुणच अनेक आजारांचं कारण बनतो. जेव्हा आंघोळ केल्यावर आपण शरीर पुसतो तेव्हा टॉवेलमध्ये ओलावा येतो आणि शरीरातील मळ-मातीही त्यावर लागते. ओलाव्यामुळे त्यात बॅक्टेरिया आणि फंगस वेगाने वाढतात. २०१४ मध्ये अमेरिकेत करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये आढळलं की, टॉवेलमध्ये ८९ टक्के कॉलिफोर्म बॅक्टेरिया आणि २५.६ टक्के ई-कोलाई बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया पोटासंबंधी आजार, फ्लू आणि जखमांमध्ये इन्फेक्शन होण्याचं कारण ठरतात. ई-कोलाई बॅक्टेरिया न्यूमोनिया, श्वासासंबंधी समस्या आणि यूरिन इन्फेक्शनचं कारण बनतात.
त्वचेसंबंधी समस्या
टॉवेलमुळे होणाऱ्या आजारांमध्ये स्कीन इन्फेक्श सगळ्यात कॉमन आहे. घाणेरड्या टॉवेलने बॅक्टेरिअल आणि फंगल इन्फेक्श होतं. त्याशिवाय त्वचेसंबंधी समस्या जसे की, एक्झिमा आणि सोरायसिस टॉवेलमुळे वाढू शकतो. एक्झिमा आणि सोरायसिसमध्ये स्कीनची बाहेरील बाजू खराब होते. अशात टॉवेल अॅंटी-सेप्टिक लिक्विडमध्ये टाकून धुतलं पाहिजे आणि रोज उन्हात वाळत घातला पाहिजे. जेणेकरून बॅक्टेरिया नष्ट होतील.
टॉवेलने इन्फेक्शन
टॉवेलमुळे इन्फेक्शन फार वेगाने पसरतं. जर कुणाला पिंपल्स असतील आणि त्यात पस झाला असेल तर त्यांचा टॉवेल इतरांनी कुणीही वापरू नये. त्याशिवाय ह्यूमन पेपिलोमा वायरससारखं इन्फेक्शनही टॉवेलद्वारे पसरतं. या वायरसमुळे चामखीळ होतात.
टॉवेल किती दिवसांनी धुवावा?
जर तुम्हाला कोणत्या प्रकारचा आजार किंवा स्कीन इन्फेक्शन नसेल तर टॉवेल दर तीन ते चार दिवसांनी धुवावा. जर एखादं इन्फेक्शन असेल तर टॉवेल रोज धुवावा आणि उन्हात वाळत घालावा. उन्हात टॉवेल वाळत घातल्याने त्यातील बॅक्टेरिया आणि फंगस नष्ट होतात.