Heart Attack: एका व्यक्तीला किती वेळा येऊ शकतो हार्ट अटॅक? जाणून घ्या बचावाचे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 09:55 AM2022-11-04T09:55:11+5:302022-11-04T09:55:27+5:30
How Many Times Heart Attack May Occurs: सामान्यपणे अनहेल्दी डाएट, चुकीची लाइफस्टाईल, लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर या कारणांमुळे व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. ज्यामुळे त्यांचा जीव जाऊ शकतो.
How Many Times Heart Attack May Occurs: हृदय आपल्या शरीरातील महत्वाचं अवयव आहे. जर जास्त काळ जगायचं असेल तर हृदयाचे योग्य काम करणं फार गरजेचं आहे. सामान्यपणे अनहेल्दी डाएट, चुकीची लाइफस्टाईल, लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर या कारणांमुळे व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. ज्यामुळे त्यांचा जीव जाऊ शकतो. अशात एक प्रश्न अनेक लोकांच्या मनात येतो तो म्हणजे एका व्यक्तीला किती वेळा हार्ट अटॅक येऊ शकतो?
का येतो हार्ट अटॅक?
जेव्हा आपल्या धमण्यांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, तेव्हा ते प्लाक बनवू लागतं. ज्यामुळे ब्लड वेसेल्समध्ये ब्लॉकेज होतात आणि हृदयाकडील ब्लड फ्लो स्लो होतो. अशात हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यासाठी जास्त जोर लागतो. ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि मग हार्ट अटॅक येऊ शकतो.
हार्ट अटॅकची लक्षण
- श्वास घेण्यास समस्या
- जास्त घाम येणे
- छातीत वेदना
- चक्कर येणे
- अस्वस्थता वाटणे
- डोकं गरगरणे
- जबडा किंवा दातात वेदना
- मळमळ होणे, उलटी येणे
- गॅस तयार होणे
हार्ट अटॅक किती वेळा येऊ शकतो?
जास्तीत जास्त कार्डियोलॉजिस्ट सांगतात की, कोणत्याही व्यक्ती आयुष्यात साधारण जास्तीत जास्त 3 वेळा हार्ट अटॅक येऊ शकतो. पण अनेक केसेसमध्ये हे प्रमाण कमीही असू शकतं. सामान्यपणे या आजाराचा धोका 40 ते 45 या वयात अधिक असतो. पण हा आजार कोणत्याही वयाच्या लोकांना होऊ शकतो.
हार्ट अटॅकपासून बचावाचे उपाय
- जर तुम्हाला हार्ट अटॅक टाळायचा असेल तर केवळ हेल्दी डाएट घ्या. सोबतच मीठ, साखर आणि तेलकट पदार्थ टाळा.
- सिगारेट आणि मद्यसेवन केल्याने हार्ट अटॅकचा धोका जास्त वाढतो. कारण यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. ज्याने तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो.
- वजन वाढल्यानेही हार्ट अटॅकचा धोका जास्त वाढतो. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं वजन कमी करण्याचा प्रयत्न करा.
- हृदय फीट ठेवण्यासाठी नियमितपणे एक्सरसाइज करा.