एक व्यक्ती 24 तासात किती वेळा श्वास घेते? आकडा असा ज्याचा तुम्हीही विचार केला नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 11:32 AM2024-10-25T11:32:26+5:302024-10-25T11:33:16+5:30
Breathing : तुम्ही कधी विचार केलाय का की, एक व्यक्ती 24 तासात कितीवेळा श्वास घेत असेल? श्वास तर सगळेच घेतात, पण जास्तीत जास्त लोकांना याचं उत्तर माहीत नसेल.
Breathing : मानवी शरीर हे फार आश्चर्यकारक आणि अचंबित करणारं आहे. शरीरात रोज वेगवेगळ्या प्रक्रिया सुरू असतात. यातील एक मुख्य प्रक्रिया म्हणजे श्वास घेणे. ही एक नॅचरल प्रॉसेस आहे. जी जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. सगळेच जीव श्वास घेतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, एक व्यक्ती 24 तासात कितीवेळा श्वास घेत असेल? श्वास तर सगळेच घेतात, पण जास्तीत जास्त लोकांना याचं उत्तर माहीत नसेल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
श्वास घेणं आपल्या जीवनासाठी फार महत्वाचं आहे. श्वास घेतल्यामुळेच आपण जिवंत राहतो. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीराला ऑक्सीजन मिळतं, ज्यामुळे शरीरात एनर्जी निर्माण होते.
एका दिवसात किती वेळा श्वास घेता?
एका व्यक्तीचं श्वास घेण्याचं प्रमाण हे त्या व्यक्तीच्या वयावर, आरोग्यावर आणि शारीरिक रचनेवर अवलंबून असतं. सामान्यपणे एक निरोगी व्यक्ती दर मिनिटाला 12 ते 20 वेळा श्वास घेते. याचा अर्थ 24 तासात साधारण 17 हजार ते 28, 800 वेळा श्वास घेणं. पण याचं मोजमाप करणं सोपं नाही. ही आकडेवारी सरासरी काढण्यात आली आहे.
ही आकडेवारी एका निरोगी आणि फीट व्यक्तीसाठी लागू पडते. यात व्यक्तीनुसार बदलही होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला काही आजार असेल किंवा शारीरिक समस्या असेल तर आकडेवारी बदलते. मात्र, तरीही श्वास घेणं आपल्या जीवनासाठी महत्वाचं आहे.
चांगलं आरोग्य आणि नियमितपणे व्यायाम केल्याने श्वास घेण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने होते. श्वास घेण्याची योग्य पद्धत आणि स्वच्छ हवा आपल्या शारीरिक प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे श्वास घेण्याबाबत आपण जागरूक राहिलं पाहिजे. जेणेकरून एक निरोगी आणि आनंदी जीवन जगता यावं. वायु प्रदुषणापासून बचाव केला पाहिजे.