मासिक पाळीत संरक्षणासाठी किती महिला कापड वापरतात? सॅनिटरी नॅपकिन्सकडे अद्यापही दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:03 AM2022-10-11T10:03:31+5:302022-10-11T10:03:56+5:30
मासिक पाळीदरम्यान योग्य संरक्षण न घेण्याचे प्रमाण अद्यापही अतिशय कमी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क : माणसाचा वंश चालविण्याचे महत्त्वाचे कार्य स्त्रीच्या हातून पार पाडण्याची निसर्गाची योजना असते. मासिकपाळी ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक महत्त्वाची बाब. मासिक पाळीस निसर्गाचे वरदान मानतात. मात्र या मासिक पाळीदरम्यान योग्य संरक्षण न घेण्याचे प्रमाण अद्यापही अतिशय कमी आहे. देशातील तब्बल ५० टक्के महिला मासिक पाळीच्या संरक्षणासाठी सॅनिटरी नॅपकिन्सऐवजी कापड वापरत असल्याचे समोर आले आहे.
सर्वाधिक हाल कुणाचे?
श्रीमंत असलेल्या स्त्रीयांच्या तुलनेत गरीब असलेल्या महिलांमध्ये मासिक पाळीत कापड वापरण्याचे प्रमाण तीन पट अधिक असते.
म्हणजेच ७५ टक्के गरीब महिलांमध्ये तर संपत्ती अधिक असलेल्या स्त्रियांमध्ये कापड वापरण्याचे प्रमाण २३ टक्के आहे.
स्थानिक पातळीवर तयार केलेले नॅपकिन्स, सॅनिटरी नॅपकिन्स, टॅम्पन्स आणि मासिक पाळीचे कप हे संरक्षणाच्या आरोग्यदायी पद्धती मानले जातात.
भारतात १५% महिला स्थानिक पातळीवर तयार नॅपकिन्स तर, ६४% सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात.
महिला अनेक पद्धती वापरतात. सॅनिटरी पॅड वापरणारी महिला अधूनमधून वा वारंवार कापड वापते.
सुरक्षित मासिक पाळीसाठी महिला अधिक सतर्क झाल्या आहेत. २०१५-१६ च्या ५८%च्या तुलनेत २०१९-२० मध्ये हे प्रमाण ७८ टक्के इतके वाढले आहे.
देशातील १५-२४
वर्षे वयोगटातील
५०%
स्त्रिया अजूनही मासिक पाळीच्या संरक्षणासाठी कापड वापरतात.
मासिक पाळीत संरक्षणासाठी कापड वापरणाऱ्या महिला सर्वाधिक कुठे?
अस्वच्छ कापडाच्या पुन्हा वापराने अनेक संसर्गचा धोका. कापडाचा वापर २०१५-१६ मधील ६२% च्या तुलनेत ५०% (२०१९-२०) पर्यंत घसरला आहे.
आसाम ६९.१%
मणिपूर ६३.९%
मेघालय ६३.२%
नागालँड ५६.७%
त्रिपुरा ५६.१%
अरुणाचल ३१.५%
लक्षद्विप २१.८%
मिझोराम ११.१%