एका दिवसात किती दूध प्यायला हवं? जास्त कराल सेवन तर होईल मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 12:04 PM2024-06-18T12:04:14+5:302024-06-18T12:16:55+5:30

कोणत्याही गोष्टीची अति केली तर नुकसानच होत असतं. तेच दुधाबाबतही लागू पडतं. दुधाचं जास्त सेवन केल्याने काही नुकसानही होतात.

How much milk is safe in a day you should know | एका दिवसात किती दूध प्यायला हवं? जास्त कराल सेवन तर होईल मोठे नुकसान

एका दिवसात किती दूध प्यायला हवं? जास्त कराल सेवन तर होईल मोठे नुकसान

दूध हे आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आणि शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे. डॉक्टरही नेहमीच दूध सेवन करण्याचा सल्ला देत असतात. लहान असो वा मोठे सगळ्यांनी दुधाचं सेवन केलं तर शरीराला अनेक पौष्टिक तत्व मिळतात. पण कोणत्याही गोष्टीची अति केली तर नुकसानच होत असतं. तेच दुधाबाबतही लागू पडतं. दुधाचं जास्त सेवन केल्याने काही नुकसानही होतात.

काही लोकांचं मत असतं की, शारीरिक विकासासाठी भरपूर दूध प्यावं. पण हे खरं नाहीये. दूध जरी एक संपूर्ण आहार असलं तरी याचं सेवन योग्य प्रमाणातच केलं जावं. सर्दी-खोकला, अपचन, डायरिया, स्किन डिजीज अशा स्थितींमध्ये दुधाचं सेवन करू नये.  त्याशिवाय ज्या लोकांना दुधाची एलर्जी आहे त्यांनीही दुधाचं सेवन करू नये. अशात किती दूध पिणं फायदेशीर असतं हे जाणून घेऊ.

किती दूध प्यावं?

एका निरोगी व्यक्तीने नियमितपणे दूध प्यावं. यातून शरीराला कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी, कॅलोरी, पोटॅशिअम, प्रोटीन आणि हेल्दी फॅट मिळतं. यूनायटेड स्टेट्सच्या नॅशनल डायटरी गाइडलाईन्सनुसार, एका वयस्की व्यक्तीने रोज ३ कप (७५० मिली) दूध प्यावं आणि लहान मुलांनी २.५ कप दूध प्यावं.

असं असलं तरी हे प्रमाण व्यक्तीच्या शारीरिक गरजेनुसार कमी किंवा जास्त होऊ शकतं. सामान्यपणे रोज ५०० मिली दुधातूनही कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी पुरेसं मिळतं.

जास्त दुधाने काय होतं नुकसान

स्वीडनमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ३ कपांपेक्षा जास्त दूध प्यायल्याने हिप फ्रॅक्चर, हाडांसंबंधी समस्या, इतकंच नाही तर जीवालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे जास्त दूध प्यायल्याने हाडं जास्त मजबूत होतात असा गैरसमज ठेवू नका. लहान मुलांना जास्त दूध दिलं तर त्यातील कॅलरीमुळे पोट भरलेलं राहतं. अशात लहान मुलं जेवण करणंही टाळतात.

तसेच जास्त दूध प्यायल्याने लहान मुलांमध्ये आयर्नचं प्रमाण कमी होतं. खासकरून फेरिटिन नावाचं आयर्न जे आयर्न स्टोरेजच्या रूपात शरीरात असतं. यामुळे आयर्न डिफिशिएन्सी एनीमियाचा धोका वाढतो.

Web Title: How much milk is safe in a day you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.