कोणत्या वयात किती झोपेची असते आवश्यकता?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 01:20 PM2018-07-09T13:20:24+5:302018-07-09T13:21:01+5:30
शरीराच्या फिटनेससाठी चांगली झोप मिळणे गरजेचे आहे. मात्र, जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल तसेच याचा प्रभाव तुमच्या शरीर आणि मन या दोन्हीवर पडेल.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकजण दिवसभर काम करुन थकलेला असतो. अनेकज ऑफीसमध्ये भरपूरवेळ काम करत असतात. जर तुमची झोप पूर्ण झाली तर तुम्ही दिवसभर आनंदी, उत्साही आणि ताजेतवाने राहाल.
शरीराच्या फिटनेससाठी चांगली झोप मिळणे गरजेचे आहे. मात्र, जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल तसेच याचा प्रभाव तुमच्या शरीर आणि मन या दोन्हीवर पडेल. म्हणूनच रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमची झोपही पूर्ण होईल आणि सकाळी तुम्ही लवकर उठाल.
जर तुम्ही रात्री उशिरा घरी येता आणि सकाळी लवकर उठत असाल तर तुमची झोप पूर्ण होणार नाही आणि याचा वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर पडू शकतो. त्यामुळेच वेळेवर झोपण्याची आणि उठण्याची सवय असणे गरजेचे आहे. जेवढी आपल्याला गरज आहे तेवढेच झोपणे आवश्यक आहे. जास्तवेळ झोपणे किंवा कमीवेळ झोपणेही शरीरासाठी धोकादायक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कुठल्या वयाच्या व्यक्तीला किती झोपेची आवश्यकता असते.
यावरुन तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या परिवारातील कुठल्या व्यक्तीला किती जोपेची आवश्यकता आहे. जर तुमच्या परिवारातील सदस्यांना पूर्ण झोप मिळाली तर सर्वचजण आनंदी, उत्साही आणि ताजेतवाने राहाल. म्हणूनच पूर्ण झोप घ्या आणि ताजेतवाने राहा.