एका दिवसात किती साखर खाणं योग्य? जाणून घ्या साखर खाण्याचं योग्य प्रमाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 04:30 PM2024-09-07T16:30:33+5:302024-09-07T16:50:04+5:30

How Much Sugar Eat Per Day : अनेकांना असाही प्रश्न पडतो की, त्यांनी दिवसभरात किती साखर खावी? तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

How much sugar you can in a day safe? Know the right amount | एका दिवसात किती साखर खाणं योग्य? जाणून घ्या साखर खाण्याचं योग्य प्रमाण!

एका दिवसात किती साखर खाणं योग्य? जाणून घ्या साखर खाण्याचं योग्य प्रमाण!

How Much Sugar Eat Per Day : साखर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. जास्तीत जास्त लोक रोज साखरेचं वेगवेगळ्या माध्यमातून सेवन करत असतात. मात्र, जसं म्हणतात की, कोणत्याही गोष्टीची अति नुकसानकारक असते. तेच साखरेबाबतही लागू पडतं. अशात अनेकांना असाही प्रश्न पडतो की, त्यांनी दिवसभरात किती साखर खावी? तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

साखरेचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. मुख्यपणे यामुळे हृदयरोग, लठ्ठपणा, डायबिटीस यांसारख्या समस्यांचा धोकाही वाढतो. अशात तुम्ही हे जाणून घेण गरजेचं आहे की, एका निरोगी व्यक्तीने दिवसभरात किती साखर खावी. 

दिवसभरात किती साखर खावी?

जास्त साखर खाल्ल्याने शरीरात कॅलरीचं प्रमाण वाढतं. कारण साखरेमध्ये कॅलरीचं प्रमाण भरपूर असतं. याने शरीरात शुगरही वाढते. एनसीबीआयनुसार, एका निरोगी महिलेने दिवसभरातून ६ टीस्पून म्हणजे २५ ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नये. तेच एका निरोगी पुरूषाने ९ टीस्पून म्हणजे ३८ ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नये. जर तुम्ही यापेक्षा जास्त साखरेचं सेवन केलं तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

साखर खाल्ल्याने वजन वाढतं?

साखर खाल्ल्याने वजन वाढतं का? असा प्रश्नही अनेकांना पडत असतो. याचं उत्तर होय असं आहे. साखर खाल्ल्याने शरीराचं वजन वाढतं. मात्र, वजन वाढण्याचं हेच एक कारण नाही. इतरही अनेक गोष्टींमुळे वजन वाढतं. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, साखरेचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या शरीरात अतिरिक्त कॅलरी जमा होऊ लागता. ज्यामुळे शरीराचं वजन वाढतं. अनेक हेल्थ एक्सपर्ट जास्त साखर न खाण्याचा सल्ला देतात. साखर शरीरात कॅलरी वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे.

साखर खाण्याचे नुकसान

- जर तुम्ही फार जास्त प्रमाणात नियमितपणे साखरेचं सेवन करत असाल तर तुम्हाला टाइप १ डायबिटीस होण्याचा धोका असतो. 

- जर तुम्ही रोज जास्त साखर खात असाल तर तुमच्या पॅन्क्रियाजमध्ये इन्सुलिनचं उत्पादन अधिक प्रमाणात होऊ शकतं. 

- साखरेच्या जास्त सेवनाने तुम्हाला हृदयासंबंधी समस्या होण्याचा धोका असतो. 

- तसेच नेहमीच जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा आणि वजन वाढतं. 

- जास्त गोड खाल्ल्याने डोकेदुखी आणि तणाव यांसारख्या समस्याही होतात. 
 

Web Title: How much sugar you can in a day safe? Know the right amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.