सोशल मीडियावर किती वेळ असता?, फक्त अर्ध्या तासाने कमी करा वापर; अभ्यासातून दिसले 'चमत्कारी' फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 02:06 PM2023-12-18T14:06:45+5:302023-12-18T14:48:15+5:30
Mental Health Tips : अभ्यासकांना आढळलं की, सोशल मीडियाचा वापर कमी केल्याने तुमचा परफॉरमन्स वाढतो आणि तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं.
Mental Health Tips : सोशल मीडियाने सध्या लोकांना वेड लावलं आहे. लोक एकमेकांशी बोलण्यात कमी सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव असतात. एकप्रकारे जास्तीत जास्त लोक सोशल मीडियात बंदीस्त झाले आहेत. ज्यामुळे लोकांचं मानसिक आरोग्य आणि कामाचं कौशल्य कमी होत आहे. याबाबत करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, सोशल मीडियाचा 30 मिनिटे कमी वापर केला तर तुमचं मानसिक आरोग्य सुधारू शकतं आणि कामातही तुमचं जास्त लक्ष लागून तुमचं करिअर चांगलं होऊ शकतं. अभ्यासकांना आढळलं की, सोशल मीडियाचा वापर कमी केल्याने तुमचा परफॉरमन्स वाढतो आणि तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं.
सोशल मीडिया आज आपल्या जीवनात एक भाग झाला आहे. लोक जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतात. यामुळे अनेक मानसिक समस्या होऊ लागल्या आहेत. Ruhr University Bochum आणि the German Center मधील अभ्यासकांना आढळलं की, सोशल मीडिया बघण्याचा वेळ कमी केला तर लोकांना त्यांची कामे करण्यास जास्त वेळ मिळेल आणि तुमचा वेळही वाया जाणार नाही.
रिसर्चच्या मुख्य लेखिका Julia Brailovskaia म्हणाल्या की, 'कामावरून दुर्लक्ष होण्याचा आपला मेंदू चांगला सामना करू शकत नाही. जे लोक आपलं काम सोडून सोशल मीडियावर वेळ घालतात त्यांचा परफॉर्मंस खराब होतो'.
हा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांनी 166 लोकांना सहभागी करून घेतलं होते. जे दिवसातून कमीत कमी 35 मिनिटे वेळ सोशल मीडियावर टाइमपाससाठी घालवत होते. त्यांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं. एका ग्रुपने त्यांची सोशल मीडियाची सवय सोडली नाही आणि दुसऱ्या ग्रुपने त्यांची सोशल मीडिया बघण्याची वेळ 7 दिवसांसाठी 30 मिनिटाने कमी केली.
अभ्यासकांना आढळलं की, कमी वेळाच्या या प्रयोगानंतर ज्या सहभागी लोकांनी सोशल मीडिया बघण्याची वेळ कमी केली होती त्यांना कामात आनंद मिळू लागला आणि त्यांचं मानसिक आरोग्यही स्थिर होतं.
अभ्यासकांनी यात दिसून आलं की, लोक सोशल मीडिया जगासोबत राहण्याच्या भावनेने वापरतात. पण यामुळे त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. खासकरून तेव्हा जेव्हा त्यांच्यावर कामाचा खूप जास्त भार असतो.
अभ्यासकांनी सांगितलं की, दिवसभरातील थोडा वेळ सोशल मीडिया बघणं टाळलं तर तुमचा मूड चांगला होतो. ही सवय जास्त काळासाठी ठेवली तर याचा तुम्हाला पुढे खूप जास्त फायदा होऊ शकतो. तुमचा सकारात्मकपणा वाढेल आणि तुमच्या कामातही सुधारणा होईल.