उन्हाळ्यात तुम्ही दिवसातून किती पाणी प्यावं आणि का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 09:36 AM2024-03-13T09:36:05+5:302024-03-13T09:37:30+5:30
Water Benefits: आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, उन्हाळ्यात दररोज किती पाणी प्यावे आणि याने काय फायदे मिळतील.
Water Benefits: आपल्या शरीराचा जवळपास 70 टक्के भाग हा पाण्यापासून बनलेला असतो आणि पृथ्वीवरही जवळपास 71 टक्के पाणीच आहे. यावरून तुम्ही अंदाज लावून शकता की, पाणी किती महत्वाचं आहे. डॉक्टर नेहमीच सल्ला देत असतात की, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पाणी प्यावे. तेच उन्हाळ्यात पाणी अजूनच जास्त प्यावं लागतं. पाण्याने शरीर हाइड्रेटे ठेवण्यास मदत मिळते आणि सोबत याचे शरीराला अनेक आरोग्यदायी लाभही मिळतात. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, उन्हाळ्यात दररोज किती पाणी प्यावे आणि याने काय फायदे मिळतील.
दररोज किती पाणी प्यावे?
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, एका वयस्क व्यक्तीला आरोग्यासंबंधी समस्या दूर ठेवण्यासाठी रोज कमीत कमी 2.7 लीटर पाणी पिणं गरजेचं आहे. असं केलं नाही तर डिहायड्रेशन धोका वाढू शकतो. तेच एक आदर्श आकडा सांगायचा तर एका दिवसात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं.
तसेच शरीराला पाण्याची किती गरज असते हे यावरही अवलंबून असतं की, तुम्ही दिवसभर कशाप्रकारचं काम करता. म्हणजे तुम्ही घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा बाहेर उन्हात काम करता का? यावर शरीराची पाण्याची गरज अवलंबून असते. कारण व्यक्ती व्यक्ती शरीरात फरक असतो.
भरपूर पाणी पिण्याचे फायदे
शारीरिक क्षमता वाढते
पाणी प्यायल्याने केवळ शरीर हायड्रेट राहतं असं नाही तर दिवसभराच्या कामादरम्यान एनर्जी सुद्धा देतं. ज्याच्या मदतीने तुम्ही दिवसभर चांगलं काम करू शकता. जेव्हा शरीर पूर्णपणे हायड्रेटेड असतं तेव्हा फिजिकल अॅक्टिविटीमध्ये सुधारणा होते.
मेंदुची क्रियाही वाढते
शरीरात पाणी कमी असेल तर शरीराला अनेक सामान्य कामे करण्यासही संघर्ष करावा लागतो. कारण मेंदू डिहायड्रेशनने खूप बराच प्रभावित होतो. काही रिसर्चनुसार, थोड्या डिहायड्रेशनने सुद्धा मेंदुच्या क्रियेवर प्रभाव पडतो.
बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी जे काम करायचंय की, भरपूर पाणी प्यावे. असं केल्याने तुमची ही समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
किडनी स्टोनमध्ये फायदेशीर
जर एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या असेल त्यांनी भरपूर पाणी पिणं फार गरजेचं आहे. किडनी स्टोनच्या रूग्णांनी किती पाणी प्यावं याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यांचा सल्ला फॉलो केला तर याने मदत मिळू शकते.