रोज ४५ मिनिटे पायी चालून किती दिवसात किती कमी होईल वजन? जाणून घ्या खास फंडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 11:36 AM2024-11-09T11:36:33+5:302024-11-09T12:02:35+5:30

Weight Loss : रोज ४५ मिनिटे वॉक करून तुम्ही महिनाभरात काही किलो वजन कमी करू शकता.

How much weight will be loss by walking for 45 minutes every day? | रोज ४५ मिनिटे पायी चालून किती दिवसात किती कमी होईल वजन? जाणून घ्या खास फंडा!

रोज ४५ मिनिटे पायी चालून किती दिवसात किती कमी होईल वजन? जाणून घ्या खास फंडा!

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी लोक आजकाल वेगवेगळ्या गोष्टी करतात. काही लोक जिममध्ये घाम गाळतात तर काही लोक डाएटमध्ये बदल करतात. कुणी एरोबिक्स करतं तर कुणी सायकलिंग. पण तुम्हाला हे सगळं करण्यासाठी वेळ नसेल किंवा या गोष्टींचा कंटाळा येत असेल तर तुम्ही एक सोपं काम करूनही वजन कमी करू शकता.  ते सोपं काम म्हणजे वॉक म्हणजेच चालणं. पायी चालूनही तुम्ही वजन कमी करू शकता.

रोज ४५ मिनिटे वॉक करून तुम्ही महिनाभरात काही किलो वजन कमी करू शकता. महिनाभर रोज ४५ मिनिटे ते १ तास पायी चालून तुम्ही वेगाने वजन कमी करू शकता. अशात ४५ मिनिटांचा वॉक करून तुम्ही किती दिवसात वजन कमी करू शकता आणि किती कॅलरी बर्न करता? याचं उत्तर जाणून घेऊ.

४५ मिनिटात किती किलोमीटर वॉक?

वजन कमी करण्यासाठी पायी चालणं हा सगळ्यात प्रभावी आणि सोपा उपाय आहे. जर तुम्ही रोज ४५ मिनिटे पायी चालत असाल आणि महिनाभर हा उपाय कराल तर याने काही किलो वजन कमी करू शकता. जेव्हा तुम्ही सामान्य स्पीडने चालता तेव्हा ४५ मिनिटात किंवा १ तासात साधारण ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वॉक करता. जे लोक वेगाने चालतात ते ४५ मिनिटात ५ ते ६ किलोमीटर अंतर पार करतात.

४५ मिनिटे वॉक करून किती कॅलरी बर्न होतात?

रोज अशाप्रकारे ४५ मिनिटे वॉक करून तुम्ही रोज साधारण १५० ते २०० कॅलरीपर्यंत बर्न करू शकता. ज्यामुळे तुम्हाला वेगाने वजन कमी करण्यास मदत मिळेल. जर तुम्ही १ तास धावत असाल तर महिनाभरात तुम्ही ४ ते ५ किलो वजन कमी करू शकता. जर तुम्ही रोज नॉर्मल वॉक कराल तर महिनाभरात २ ते ३ किलो वजन कमी करू शकता. मात्र, पायी चालण्यासोबतच तुम्हाला हेल्दी डाएटही फॉलो करावी लागेल. तेव्हाच तुम्ही लवकर वजन कमी करू शकाल. 

Web Title: How much weight will be loss by walking for 45 minutes every day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.