किती प्रमाणात झिंक सेवन करताय? अतिसेवन देऊ शकते गंभीर रोगांना आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 02:39 PM2021-06-02T14:39:46+5:302021-06-02T14:41:05+5:30

कोरोनाकाळात कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं फारच गरजेच झालंय. सध्या काही जणांचा औषधे अथवा गोळ्यांच्या माध्यमातूनही रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याकडे कल दिसून येतो. यासाठी झिंकच्या गोळ्यांचा वापर केला जातो. झिंक म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, पाहुया झिंक म्हणजे नक्की काय आहे?रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या नादात आपण झिंकचे अतिसेवन करत नाही आहात ना? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

How much zinc is consumed? Overdose can invite serious diseases | किती प्रमाणात झिंक सेवन करताय? अतिसेवन देऊ शकते गंभीर रोगांना आमंत्रण

किती प्रमाणात झिंक सेवन करताय? अतिसेवन देऊ शकते गंभीर रोगांना आमंत्रण

Next

सध्या सर्वांच लक्ष एकाच गोष्टीकडे लागलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकडेच. सध्या परीस्थीतीही तशीच आहे. कोरोनाकाळात कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं फारच गरजेच झालंय. सध्या काही जणांचा औषधे अथवा गोळ्यांच्या माध्यमातूनही रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याकडे कल दिसून येतो. यासाठी झिंकच्या गोळ्यांचा वापर केला जातो. झिंक म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, पाहुया झिंक म्हणजे नक्की काय आहे.
डॉ.मकाल्या मॅक्सिनार यांनी हेल्थलाईन या वेबसाईटला झिंक म्हणजे नेमके काय? आणि त्याचे सेवन केल्याने काय त्रास होऊ शकतात हे सांगितले आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या नादात आपण झिंकचे अतिसेवन करत नाही आहात ना? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

झिंक म्हणजे काय?
झिंक हा असा घटक आहे ज्यामुळे व्हायरसचा शरीरातील प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. शरीरातील जवळजवळ ३०० क्रिया सुरळीतरित्या पूर्ण होण्यासाठी झिंकची आवश्यकता असते.

झिंक किती प्रमाणात सेवन करावे?
१८ पेक्षा जास्त  वयोगटातील पुरुषांना ११ मिलीग्राम झिंकची आवश्यकता असते तर महिलांना ९ मिलीग्राम झिंक गरजेचे असते. गर्भवती महिलांसाठी ११ ते १२ मिलिग्रॅम झिंक घेण्याचा सल्ला दिला जातो. तर ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांसाठी १२ ते १३ ग्रॅम झिंक घेण्याचे डॉक्टर सांगतात.

झिंकच्या अतिसेवनाचे तोटे

पोटाचे विकार
झिंकचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटाचे विकार संभवतात. यात मळमळल्यासारखे होणे, उलट्या, जुलाब असे त्रास होतात. झिंकच्या जास्त प्रमाणामुळे तुमच्या पाचनशक्तीवर परीणाम होऊ शकतो.

ताप येणे किंवा संबधित आजार
झिंकच्या अतिसेवनामुळे ताप येणे, सर्दी, डोकेदुखी, थकवा असे त्रास संभवतात. अशावेळी डॉक्टर तुमची रक्तचाचणी करून शरीरात किती प्रमाणात झिंक आहे हे तपासतात.

हृदयाचे आजार
झिंकच्या अतिसेवनामुळे शरीरात एचडीएल कॉलेस्ट्रॉलचे (चांगले कॉलेस्ट्रॉलचे) प्रमाण कमी होते. या प्रकारचे कॉलेस्ट्रॉल एलडीएल म्हणजेच वाईट कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. पण शरीरात झिंक जास्त असल्यास चांगल्या कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

चवीत बदल होणे
झिंच्या अतिसेवनामुळे तुमच्या चवीमध्ये बदल होतो. तुम्हाला तोंडात मेटलसारखी चव निर्माण होते. त्यामुळे झिंकचे अतिसेवन टाळणेच गरजेचे.


 

Web Title: How much zinc is consumed? Overdose can invite serious diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.