बेडशीट आणि उशीचे कव्हर किती दिवसांनी बदलणं गरजेचं? रिसर्चमधून खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 02:18 PM2024-06-03T14:18:07+5:302024-06-03T14:19:31+5:30

Bacteria on Bed sheets : यात कोट्यावधी बॅक्टेरिया असतात. त्यामुळे तुम्ही बेडशीट किती दिवसात स्वच्छ केली पाहिजे आणि किती दिवसात बदलली पाहिजे याबाबत जाणून घेऊ.

How often change your bed sheet and pillow cover | बेडशीट आणि उशीचे कव्हर किती दिवसांनी बदलणं गरजेचं? रिसर्चमधून खुलासा...

बेडशीट आणि उशीचे कव्हर किती दिवसांनी बदलणं गरजेचं? रिसर्चमधून खुलासा...

Bacteria on Bed sheets : झोपायचा विषय निघाला की, बेड, गादी, बेडशीट आणि उशी यांचाही उल्लेख होतोच. बऱ्याच लोकांचा जास्तीत जास्त वेळ हा त्यांच्या बेडवरील जातो. अशात तुमची बेडशीट किंवा उशांचे कव्हर तुम्ही किती दिवसात बदलायला हवेत? हे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. आपण सगळेच स्वच्छ कपडे घालतो. पण जास्तीत जास्त लोक बेडशीटची स्वच्छता आणि उशीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही अनेक दिवसांपासून वापरत असलेली तुमची बेडशीट तुमच्यासाठी फार गंभीर ठरू शकते. कारण यात कोट्यावधी बॅक्टेरिया असतात. त्यामुळे तुम्ही बेडशीट किती दिवसात स्वच्छ केली पाहिजे आणि किती दिवसात बदलली पाहिजे याबाबत जाणून घेऊ.

जास्तीत जास्त लोक आपला वेळ बेडवर जास्त घालवतात. अनेकदा लोक बेडवरच जेवण करतात. सामान्यपणे सगळ्यांना सवय असते की, गादीवर झोपण्याआधी किंवा बसण्याआधी लोक चादर झटकतात आणि उशी झटकतात व त्यांचा वापर करतात. पण असं कितीही केलं तरी त्यांवरील न दिसणारे कोट्यावधी बॅक्टेरिया-फंगस तसेच असतात.

एका रिसर्चमधून समोर आलं की, रिसर्च दरम्यान काही लोकांनी नवीन बेडशीट आणि उश्या वापरल्या. ४ आठवडे त्यांचा वापर केला. जेव्हा ४ आठवड्यांनंतर या बेडशीट आणि उश्यांना मायक्रोस्कोपखाली बघण्यात आलं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला.

या रिसर्चमधून असं आढळून आलं की, एक महिने जुन्या बेडशीटमध्ये साधारण १ कोटींपेक्षा जास्त बॅक्टेरिया आढळले. बॅक्टेरियांची ही संख्या तुमच्या टूथब्रश स्टॅंडमध्ये असलेल्या बॅक्टेरियाच्या संख्येपेक्षा ६ पटीने अधिक आहे. तसेच ३ आठवडे जुन्या बेडशीटमध्ये ९० लाख बॅक्टेरिया, २ आठवडे जुन्या बेडशीटमध्ये ५० लाख आणि १ आठवडे जुन्या बेडशीटमध्ये ४५ लाख बॅक्टेरिया होते.

तुमचा विश्वास बसणार नाही, पण सगळ्यात घाणेरडी आपली उशी असते. कारण आपला चेहरा आणि केस याच उशीवर असतात. यामुळे तेल, घाम आणि डेड स्कीन सगळ्यात जास्त उशीवरच असते. ४ आठवडे जुन्या उशीवर १.२ कोटी बॅक्टेरिया असतात. त्यासोबतच एक आठवडे जुन्या उशीच्या कव्हरवर ५० लाख बॅक्टेरिया असतात.

कधी बदलावी बेडशीट आणि उशीचे कव्हर?

डॉक्टरांनी सांगितलं की, दर आठवड्यात आपण आपली बेडशीट आणि उशीचं कव्हर बदललं पाहिजे. हे गरजेचं नाही की, बेडशीटवर पडला असेल किंवा त्यातून वास येत असेल. अनेकदा चांगला वास येणाऱ्या बेडशीटमध्येही लाखो बॅक्टेरिया असतात.

जर बेडशीट आपण लगेच स्वच्छ केली नाही तर धोका आणखी वाढू शकतो. झोपताना आपल्या अनेक कोशिका मरतात. ज्या बेडमध्ये मिक्स होतात. हे नुकसानकारक आहे. जर तुम्ही यांना स्वच्छ करणार नाही तर बेडशीटमध्ये तुमच्या डेड सेल्स जमा होतात.

Web Title: How often change your bed sheet and pillow cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.